श्री. हेमंत निंबा बडगुजर, कुर्हे पानाचे – सन २०२० चा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

कुर्हे पानाचे, ता. भुसावळ येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री.हेमंत निंबा बडगुजर, यांना दिल्ली नवोदित साहित्यकार मंच व यूथफाॕर सोसायटी डेव्हलपमेंट(रजि.)चे विशिष्ठ अतिथी श्रीमती शकुंतला चंडीगढ़(साहित्य प्रेमी तथा कवीयित्री), श्री.किरण बाला चंडीगढ़ (सामाजिक कार्यकर्ते),श्रीमती मोनिका शर्मा ‘मन'(साहित्य प्रेमी व कवीयित्री).मुख्य आतिथी श्री.राधा कांत पांडे,श्री.जय सिंह आर्य,श्री.मनोज मिश्रा,मीनाराव खंडेराव (छत्तीसगढ़ पोलीस फोर्स) यांचे प्रमुख उपस्थितीत सन २०२० चा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करून सन्मानीत करण्यात आले.


सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.सागर देहलवी व आदिल सरफरोस तथा मंच संचालक जय अवस्थी व निर्देश प्रजापति यांनी कौशल्यपूर्वक केले. श्री.हेमंत बडगुजरसरांना या आधिही विविध उपक्रम राबविलेबद्दल १७-१८ पुरस्कारराने सन्मानीत करणेत आलेले आहे.
संस्थेेेेचे चेअरमन श्री.एकनाथ राजाराम शेठ बडगुजर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.डी.पाटील सर, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग ,कु-हेवासी व परिसरातील समाज व समाजेतर बंधूभगिनींकडून श्री. हेमंतसरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. हेमंत बडगुजर सर हे आदर्श शिक्षक पुरस्कृत कला शिक्षक आहेत. आणि शैक्षणिक क्षेत्रात जशी आवड त्यांना आहे तशीच आवड सामाजिक कार्य करण्याची पण आहे. ते नेहमीच समाजकार्यात सक्रिय असतात. यासाठी आतापर्यंत त्यांना बरेचसे पुरस्कार ही मिळालेले आहेत. तसेच ते बडगुजर प्राऊड ग्रुपचे सदस्य असून बडगुजर. इन चे वेब प्रतिनिधी आहेत.
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राॕऊड गृप व वेब पोर्टल टीमतर्फे उपक्रमशील श्री.हेमंत सरांचे हार्दिक अभिनंदन व भविष्यांत भरीव कार्यासांठी शुभेच्छा.

श्री. हेमंत बडगुजर सर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारतांना

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*