17 फेब्रुवारी 2019 रोजी पारोळा येथे अखिल भारतीय बडगुजर समाज महिला महासमिती तर्फे भव्यदिव्य असा महिला मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्यात समाजा मधल्या रूढी परंपरा व इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व ठराव मांडण्यात आले व ते मान्य करण्यात आले. तसेच बडगुजर समाजाला डिजिटल व्यासपीठ याच मेळाव्यातून मिळाले.


या मेळाव्यासाठी माझ्या महिला सहकारी महिलांनी श्रम घेतले. त्या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा मेळावा ना भुतोना भविष्यतो ठरला. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व इतर राज्यातून महिलांनी फार उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला.


महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी मला फार मोठे अनमोल सहकार्य केले. अखिल भारतीय बडगुजर समाज व महिला महासमिती अध्यक्ष या नात्याने मी रत्नाताई बडगुजर आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून माझ्या सहकारी महिलांना व पुरूषांना समाज बांधवांना मनापासून आभार मानते. असेच प्रेम माझ्यावर भविष्यात ही असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


Leave a Reply