डॉ. नितीन बडगुजर यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी आपली पीएच.डी. समाजसेवा अंतर्गत “A study of the participation in rural development of government of Maharashtra’s Jalswarajya Prakalpa with special reference to Jalgaon district” या विषयावर संशोधन करून प्राप्त केली.
डॉ. नितीन बडगुजर हे मूळचे यावल जिल्हा जळगाव येथील असून त्यांनी आपलं पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण जळगाव येथेच पूर्ण केलं. ते गेल्या १७ वर्षांपासून लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सेवा बजावत आहेत.
त्यांचा शैक्षणिक आलेख पुढील प्रमाणे:
श्री. नितीन बडगुजर यांचा शैक्षणिक आलेख उत्तुंग असून प्रेरणादायी वाटावा असाच आहे.
B.A. (भूगोल )
MSW (Community development)
M.Phil. in Social Work
NET परीक्षा पास
Ph.D. in Social Work
डॉ. नितीन बडगुजर हे संशोधन कार्यात सतत कार्यरत असतात. त्यांचे शोधनिबंध अनेक प्रथितयश मासिकांमध्ये प्रकाशित झालेले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये, कार्यशाळांमध्ये व सत्रांमध्ये देखील आपले शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत.
विद्यार्थी विकास व N.S.S. ही त्यांची पसंतीची कार्यक्षेत्रे असून त्यात ते झोकून देऊन कार्य करत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे जिल्हा समन्वयक म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. समाज, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील अनेक शैक्षणिक व प्रशासनिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे व समर्थपणे त्यांनी पेलल्या आहेत.
पुरस्कार:
डॉ. नितीन बडगुजर यांच्या भरीव कार्याची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.
१. मानव सेवा राज्य पुरस्कार:- हा पुरस्कार त्यांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल मानव सेवा सोसायटी, लातूर यांच्यातर्फे देण्यात आला.
२. क्रियाशील शिक्षक पुरस्कार:- हा पुरस्कार त्यांना मधु स्नेहा परिवार, खिरोदा यांच्याकडून देण्यात आला.
३. आदर्श शिक्षक पुरस्कार:- हा पुरस्कार त्यांना डी. एस. बडगुजर अमृत महोत्सव समिती, जळगाव यांच्यातर्फे देण्यात आला.
डॉ. नितीन बडगुजर यांनी त्यांच्या अमूल्य संशोधनावर आधारित ‘ग्रामीण विकासाचे तंत्र जलस्वराज्य प्रकल्प’ या पुस्तकाचं देखील लेखन केलं आहे. डॉ. नितीन डॉ. नितीन बडगुजर यांचे सर्व समाजबांधव मित्र परिवार आणि कॉलेज स्टॉफ तर्फे हार्दिक अभिनंदन केले जात आहे. डॉ. नितीन यांना पीएच. डी. मिळाल्याबद्दल त्यांचे अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि समस्त वेब पोर्टल टिमतर्फे हार्दिक अभिनंदन.


Leave a Reply