धुळे येथील डॉ. मयूर संजय नंदवाळकर यांना लंडन फेलोशिप बहाल – श्री. सुनिल बडगुजर, औरंगाबाद

धुळे येथील साईबाबा हॉस्पिटल चे संचालकडॉ. मयुर संजय नंदवाळकर, एम. डी. मेडीसीन यांना दि. १२ फेब्रुवारी २०२० रोजी रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियन लंडन कॉलेजची फेलोशिप बहाल करण्यात आली. त्यांनी डायबेटीस व थॉयराईड या गंभीर आजारावर सुक्ष्म अभ्यास करून अहवाल लंडन येथे पाठविला होता. या अहवालामुळे फेलोशिप त्यांना मिळाली.

डॉ. मयुर नंदवाळकर यांनी आपले एम. बी. बी. एस. चे शिक्षण मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये पुर्ण केले तसेच एम. डी. मेडीसीन घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथून केले आहे. डॉ. मयुर नंदवाळकर यांनी फागणे व धुळे पंचक्रोशीतील आरोग्य शिबिरे मोफत घेऊन रुग्णांना सेवा देऊन लोकप्रियता मिळविली असून ही फेलोशिप मिळाल्यामुळे धुळे, फागणे, साकळी, जळगांव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डॉ. मयुर हे नेहमीच आरोग्य दुत म्हणून समाजातील बऱ्याच गरजूंना मदत आणि मार्गदर्शन करीत असतात. त्यांना मिळालेल्या फेलोशिप बद्दल त्याचे आमच्या वेब पोर्टल टिम तर्फे हार्दिक अभिनंदन.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*