ऐरोली:मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या कु ऋषिकेश बडगुजर यांची भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत येणाऱ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO या नामांकित संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलोशिप म्हणून 5 वर्षे अवधीसाठी शासकीय प्रकल्पात नियुक्ती झाली आहे,त्यामुळे त्यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
संपुर्ण देशभरातून निवड झालेल्या केवळ चार उमेदवारांपैकी कु. ऋषिकेश एक असल्याने त्यांची ही कामगिरी विशेष मानली जात आहे.
कु ऋषिकेश यांनी एक वर्षापूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली, शिक्षकी पेशातील वडील श्री चंद्रकांत बडगुजर व मातोश्री सौ मनीषा बडगुजर यांच्या प्रेरणेने उच्चशिक्षण घेण्याचे ठरविले, त्यासाठी अतिअवघड मानल्या जाणाऱ्या गेट GATE या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली व त्यात चांगले यश मिळवले.
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असतानाच त्यांना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ECIL या निवडणूक मतदान यंत्र बनवणाऱ्या संस्थेमध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली.या पदावर काम करत असताना कु ऋषिकेश यांना देशभरात प्रवास करण्याची संधी मिळाली.
या पदावर कार्यरत असतानाच DRDO या संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलोशिपपदाच्या चार जागा भरण्याचे त्यांना कळले,त्यांनी त्यासाठी आवेदन केले.लेखी परीक्षा,मुलाखत याद्वारे झालेल्या निवडीत त्यांची चार उमेदवारांमध्ये नियुक्ती झाली.सध्या ते DRDO च्या पुणे युनिटमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदावर रुजू झाले आहेत.
अखंड कष्ट,जिद्द,स्वप्नांचा ध्यास,वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद व आईवडिलांची प्रेरणा आणि भक्कम पाठबळ यामुळेच ही कामगिरी करू शकलो,अशी भावना कु ऋषिकेश यांनी विनम्रपणे व्यक्त केली.
कु. ऋषिकेश यांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक : अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
समस्त वेब पोर्टल टिम


Leave a Reply