दि. 26/01/2020 रोजी, सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या तर्फे समाजातील महिलां करिता सौभाग्यलेणेे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन तसेच महिला मंडळाच्या सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना सौभाग्यलेणेे हळदीकुंकू व वाणाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात महिला मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करून मावळत्या अध्यक्षा- सौ. सुनंदा बडगुजर व संचालक मंडळाचा निरोप समारंभ होऊन नवीन अध्यक्षा- सौ. राधिका बडगुजर व संचालक मंडळाचा अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मंडळाने जुन्या अनिष्ट रुढी परंपरांत बदल घडवून आणण्याचा निर्धार केला.
महिला मंडळाचा हा कार्यक्रम सौ. जयश्रीताई बडगुजर ( नगरसेविका – न. पा. पारोळा ) यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महिलांनी विविध मुद्दय़ांवर तसेच परंपरांवर चर्चा केली. कार्यक्रमास समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


महिला मंडळाचा प्रोत्साहनीय उपक्रम ??