बोराडी परिसरातील बडगुजर महिला भगिनींची मीटिंग श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर यांच्या राहत्या घरी घेण्यात आली.
सभेचे अध्यक्षस्थान सौ. भारती मनोज बडगुजर यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सरला ताई बडगुजर, सौ. भारती राजाराम बडगुजर, सौ. शकुंतला भास्कर बडगुजर यांनी स स्थान स्वीकारले.
कार्यक्रमाची सुरुवात कुलदेवता चामुंडा मातेच्या पूजनाने करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर यांनी केले.
मिटिंगचा प्रमुख विषय अखिल भारतीय बडगुजर समाज विवाहेच्छुक युवक-युवती परिचय पुस्तिका प्रकाशन बाबत विचार करणे हा होता.
आपल्या परिसरातील आणि आपल्या नातेवाईकांकडे फोनद्वारे कळवून विवाह इच्छुक युवक-युवती यांचे नाव नोंदणी फॉर्म भरून समाजकार्यात हातभार लावावे असे ठरले.
नोंदणी फॉर्म 25 रुपये असून लवकरात लवकर संपर्क प्रमुखांकडे जमा करावे.
संपर्क संपर्क प्रमुख हे फॉर्म्स रचना हॉल धुळे येथे जमा करतील
उशिरा नोंदणी केल्यास वधू-वर पुस्तिकेत नोंद होणार नाही अशी समज देण्यात आली.
प्रत्यक्ष फॉर्मचे वाचन व चर्चा करून न समजणारे मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले. चर्चेत उपस्थित सर्व महिलांनी हिरीरीने भाग घेतला.
वधू-वर पुस्तकाची व नोंदणी फॉर्मची संपूर्ण चर्चा झाल्यावर इतर विषयात महिलांनी हात घातला. सौ भारती राजाराम बडगुजर म्हणाल्या की “छोटे-मोठे उद्योगधंदे करणाऱ्या युवकांची व शेतकरी मुलांचाही समाजाने विचार करावा” या विषयावर त्यांनी मत व्यक्त केले. सौ सरलाताई बडगुजर म्हणाल्या की “प्रत्येकालेच नोकरी भेटण हे शक्य नाहीशे. प्रत्येक पोरींना बापाले नोकरीवाला जवाई पाहिजे आणि स्वतःला पोराले मात्र नोकरी नाहीशे. तर मंद आपल्या पोरानं लग्न तरी कसं बरं व्हईन ? हाबी ईचार जरुरी शे.”
सौ मीना रवींद्र बडगुजर म्हणाल्या की मुलींच्या बापाकडे स्वतःचे काहीच नसताना वराकडील शेती ,पक्के घर , सरकारी नोकरी , मुलगा देखणा, भरभक्कम पगार इत्यादी सर्वच गोष्टी पाहतात हे कुठेतरी थांबायला हवे.
सौ. शकुंतला भास्कर बडगुजर म्हणाल्या की “आपलाही मुलगा लग्नाचा आहे, वरीलपैकी आपल्याकडे काहीच नाही, तर आपल्या मुलाला मुलगी मिळेल का ? आपल्या मुलाचे लग्न होईल का ? असा विचार मुली वाले का करत नाहीत?”
सौ नलिनी किशोर बडगुजर म्हणाल्या की “आपल्या समाज विजातीय लग्न भरपूर परमानामा होई रानात. 20 ते 25 वरीसमा आपला बडगुजर समाज रहावाव नाही की काय अशी शंका वाटी राहणी. ही गंभीर समस्या शे. यांनाही चार्ज मागणी करालच जोयजे.”
श्रीमती बेबीबाई दगडू बडगुजर म्हणाल्या की “अते समजना फारकतीनं परमान वाढी रायनं शे. याले शिक्षण जबाबदार का कमी संस्कार? हा विचार प्रत्येकाने करणे जरुरी आहे”
सौ. उज्ज्वला पवार म्हणाल्या की “मुला-मुलींचे लग्न १८ ते २५ च्या आत होणे गरजेचे आहे. प्रत्येकाला नोकरीवाला जवाई पाहिजे तर प्रत्येक मुलगी तरी कुठे नोकरी करते? दहावी , बारावी, बीए , बीएस्सी वाल्या काहींना कुठे नोकरी लागते ? त्याही नोकरीवाला मुलगाच शोधताना दिसतात. पालकांनी यावर विचार करावा”
अध्यक्षीय भाषणात सौ. भारती मनोज बडगुजर यांनी वधू-वर पुस्तिकेत नोंदणी मोहीम बाबत परिसरातील व बाहेरगावी असलेल्या नातेवाईकांना फोन द्वारे माहिती देण्याची विनंती केली. तसेच फाॅर्म भरुन घेऊन सामाजिक कार्यास हातभार लावण्याची विनंती केली. हे एक सामाजिक कार्य आहे त्यामुळे फक्त बोराडी बोलतात विचार न करता इतरत्र राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडून देखील फॉर्म भरून घेण्याचे आश्वासन दिले.
बऱ्याच भगिनींनी समाजातील चिंताजनक बाबींबाबत मत व्यक्त केले. समाजातील विषयावर अस्था दाखवली तेव्हा खूप बरे वाटले. समाजात या जीवघेण्या सामाजिक समस्या आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी श्रीमती सुनंदा ताई आपल्या सोबत आहेतच. तसेच सर्व बडगुजर भगिनींनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे .
श्रीमती सुनंदाताई बडगुजर यांनी सर्व महिलांचे आभार मानले वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
- श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर
बोराडी, तालुका. शिरपूर
जिल्हा धुळे
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कृत कवयत्री
संपर्क : ८६६९१५९९०७

Leave a Reply