अखिल भारतीय बडगुजर समाज, पारोळा महिला अध्यक्ष पदी सौ. राधिका सचिन बडगुजर ( करोडपती) यांची निवड…

पारोळा:
येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. राधिका सचिन बडगुजर ( करोडपती) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी मावळत्या अध्यक्ष सौ. सुनंदा बडगुजर यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

उपाध्यक्षपदी सौ. रेखा नंदू बडगुजर, सचिव सौ. सुनंदा नितीन बडगुजर ,सहसचिव सौ. प्रियंका महेश बडगुजर, खजिनदार सौ. पुनम संजय बडगुजर तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून‌ सौ. प्राजक्ता गोपाल बडगुजर ,सौ. शारदा प्रवीण बडगुजर, सौ. पौर्णिमा संजय बडगुजर, सौ. सुनिता शालिग्राम बडगुजर व सौ गीता राजेंद्र बडगुजर यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री बालाजी विद्या प्रबोधिनी संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री.यु.एच. करोडपती सर तसेच श्री. प्रवीण भाऊ बडगुजर, सौ. मंगलाताई करोडपती, नगरसेविका सौ. जयश्री ताई बडगुजर व समाजातील इतर प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. सर्व नव निर्वाचित सदस्यांचा श्री. करोडपती सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नव निर्वाचित अध्यक्ष सौ. राधिका यांनी यावेळी मनोगतात सांगितले की समाजातील स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम व स्पर्धा राबवणार असल्याचे सांगितले.

सौ.राधिका बडगुजर ह्या अखिल भारतीय बडगुजर महा समितीचे माजी अध्यक्ष श्री यू.एच.करोडपती सर यांच्या स्नुषा व डॉ. सचिन उमेश बडगुजर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*