बडगुजर समाज मंडळ, चाळीसगांव यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस हा कार्यक्रम चाळीसगाव येथील श्री. मनोज पुरुषोत्तम शेठ करोडपती यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चाळीसगावातील जेष्ठ श्री. एकनाथ शेठ बडगुजर हे होते. व्यासपीठावर गावातील जेष्ठ परुष व महिला यांना स्थान देण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नती साठी, गरजवंत विद्यार्थी, निराधार, आपत्ती ग्रस्तांसाठी नेहमी मदतीचा हात देऊन समाज बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुउद्देशीयय संस्थेस, बडगुजर समाज मंडळ, चाळीसगाव यांच्या कडून 5000 रु. ची देणगी मिशन प्रतिनिधी श्री. संदीप बडगुजर, चाळीसगाव यांच्या कडे देण्यात आली. समाज मंडळाचा हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

तसेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण महाराष्ट्र सम्राज्ञी या स्पर्धेत भाग घेतलेल्या चाळीसगावच्या माहेरवाशिन व आपले अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष मा. उमेश आप्पासाहेब करोडपती यांच्या सुनबाई सौ. प्राजक्ता चेतन करोडपती यांना महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेत यांचा जळगाव,धुळे,नंदुरबार नाशिक,नगर या विभागातून एक नंबर आल्याबद्दल तसेच त्यांना महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी कडून सौंदर्य तेजस्विनी बहुमान मिळाल्याबद्दल बडगुजर समाज मंडळा कडून विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठांचा सत्कार व गुणवंत बालगोपाळांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम चे महत्व म्हणजे आपल्या जेष्ठांचा आदर करत समाज संघटनाचा धडा गिरविण्याचे काम मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे. खऱ्या अर्थाने एक छोट्या खानी चाळीसगांव समाज मंडळाचा हा एक मेळावाच होता. यात मंडळाने अगदी बालगोपाळांपासून ते जेष्ठापर्यंत सर्वांचा गौरव केला. तसेच गावातील माहेरवाशीण महिलांचा विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल सुध्दा सत्कार करण्यात आला. यातून नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळेल.

हा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी चाळीसगाव बडगुजर समाजाचे अध्यक्ष मा. श्री. शिवदास एकनाथ बडगुजर व सचिव श्री. भानुदास गंगाराम शेठ बडगुजर तसेच श्री. संदीप चंद्रकांत शेठ बडगुजर, श्री. मनोज पुरुषोत्तम शेठ करोडपती, सौ. संयोगिता यशवंत बडगुजर आदी. या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन उत्कृष्ट कार्यक्रम राबविला. आपल्या मंडळाकडून असेच संघटनेला चालना देणारे कार्यक्रम व्हावेत यासाठी शुभेच्छा.


चाळीसगावकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा