!! चला सोनशेलु चला सोनशेलु !!
सर्व बडगुजर समाजाचे कुलदेवता असलेली श्री चामुंडा माता व खानदेशातील सोनशेलु तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे सर्वप्रथम प्रतिष्ठापना झालेली , नवसाला पावणारी श्री चामुंडा मातेचा भव्य यात्रा उत्सव होणार आहे.
दिनांक 26 जानेवारी वार रविवार 2020 रोजी नवसाला पावणाऱ्या श्री चामुंडा मातेचा यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात होणार आहे.
सकाळी नऊ वाजेला होम हवन ला सुरुवात होणार आहे. होम-हवन संपल्यानंतर सकाळी दहा वाजेला मातेची महाआरती होणार आहे , महा आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी पंचक्रोशीतील समाज बांधवांनी यात्रा उत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट , समस्त सोनशेलु बडगुजर समाज मंडळ यांनी केले आहे


Leave a Reply