डॉ. सचिन बडगुजर यांची आय. डी. ए. धुळे अध्यक्षपदी निवड – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

पारोळा येथील उमंग डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. सचिन बडगुजर (करोडपती) यांची इंडियन डेंटल असोसिएशनच्या धुळे शाखा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. सेक्रेटरी डॉ. नितीन पाटील यांनी प्रेसिडेंशियल कॉलर घालून त्यांचा सन्मान
केला. त्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ राहणार आहे. या अगोदर ही त्यांनी असोसिएशनमधील विविध पदे भूषवली आहेत. नुकत्याच इंडोनेशिया मधील बाली येथे झालेल्या डेन्टकॉन या दंत परिषदेचे ते ऑर्गनायझिंग चेअरमन होते. तसेच देश-विदेशात होणाऱ्या दंत परिषदेत त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. डॉ. सचिन यांची आयडीए मध्ये एक वेगळीच ओळख आहे. आयडीए परिवारात त्यांना शाखा अध्यक्ष पद हे आपल्या व्यवस्थापन कौशल्य, प्रामाणिक पणा आणि नवनवीन संकल्पना मांडणे, नेतृत्व कौशल्य यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

डॉ. सचिन हे अत्यंत प्रेमळ आणि निखळ व्यक्तीमत्व आहेत. आणि त्यांना सामाजिक कार्याची आवड ही आधीपासूनच आहे. तसेच याआधी आयडीए मध्ये त्यांनी विविध पदे भुषविली आणि यथायोग्य जबाबदारी पुर्ण पार पाडली. यामुळेच त्यांची धुळे येथील शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

डॉ. सचिन बडगुजर हे माजी अध्यक्ष अ. भा. बडगुजर समाज महासमिती श्री. उमेश आप्पा करोडपती यांचे चिंरजीव आहेत. त्यांची प्रेसिडेंट पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बालाजी विद्या प्रबोधिनी संकुल व डॉक्टर्स असोसिएशनतर्फे त्यांचे कौतुक केले आहे. तसेच अ. भा. बडगुजर समाज महासमिती, युवक समिती आणि प्राऊड ग्रुप तर्फे डॉ. सचिन यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा.

डॉ. सचिनबडगुजर (करोडपती)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*