चोपडा येथील प्रा.श्री.गोपाल भगवान बडगुजर, सहाय्यक प्राध्यापक,कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा. (श्री.भगवान वामन बडगुजर,परदेशी गल्ली, चोपडा-प्रगतीशील शेतकरी यांचे सुपुत्र) श्री.गोपाल बडगुजर, हे यु.जी.सी.नवी दिल्ली(NTA) तर्फे डिसेंबर महिन्यात घेण्यांत आलेल्या ‘नेट परिक्षेत’ उत्तीर्ण होऊन जे.आर.एफ्.सांठी पात्र ठरले आहेत. यापपूर्वी सप्टेंबरमधील ‘सेट परिक्षेत’ देखील त्यांनी यश संपादन केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थीदशेत असतांनाही त्यांनी जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय व राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा तथा वादविवाद स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन आपला ठसा उमटवलेला आहे.
एका शेतकऱ्याच्या मुलाने असे यश संपादन केलेने चोपडा बडगुजर समाजात आनंदाचे वातावरण आहे. श्री.गोपाल बडगुजर यांचेवर सर्वत्र कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीयबडगुजर समाज युवक समिती, बडगुजर्स प्राउड गृप व वेब पोर्टल टीमतर्फे श्री.गोपाल बडगुजर व परीवाराचे हार्दिक अभिनंदन व भरीव कार्यासांठी शुभेच्छा.
????????
———————–
बातमी संकलनः श्री.पंकज करोडपती सर,चोपडा.


खुप छान…? मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ?
व पूढील वाटचालीस अनंत शुभेच्छा ! ?