बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव या संस्थेचा 2020 चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न – श्री. लिलाधर बडगुजर, जळगांव

सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा बडगुजर विद्या प्रसारक मंडळाने उत्कृ ष्ट दर्जाची दिनदर्शिका प्रकाशित केली. बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. भिला गिरधर बडगुजर उर्फ भिला गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार श्री. सुरेश दामू उर्फ राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी समाजातील मान्यवर अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री. माधवराव जानकीराम बडगुजर, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे माजी अध्यक्ष श्री. उमेश आप्पा करोडपती, समाजातील मान्यवर पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र त्र्यंबक बडगुजर, मुंबई येथील श्री. सतीश दिगंबर बडगुजर, श्री. रमेश वामन बडगुजर, श्री. अशोक वामन बडगुजर, अखिल भारतीय बडगुजर महासमिती चे सचिव श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर बडगुजर समाज वधु चे संपादक श्री. ईश्वर हरचंद बडगुजर, बर्‍हाणपूर येथील श्री. हिरालाल जी दोडे, नाशिक येथील मनपा विरोधी पक्ष नेते श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांचीही या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमा निमित्त जमलेले संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश येथील समाज बांधव यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांना दिनदर्शिकेचे मोफत वाटप करण्यात आले. बडगुजर विद्या प्रसारक मंडळाने मागील वर्षीही दिनदर्शिकेचे प्रकाशन केले होते. ही परंपरा कायम ठेवण्याचाही संकल्प मंडळाच्या कार्यकारिणीने घेतलेला आहे. उपस्थित समाजबांधवा मधून बडगुजर विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारणीची चे अभिनंदन करण्यात आले. श्री. भिला गिरधर बडगुजर यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बडगुजर विद्या प्रसारक मंडळाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा करून मंडळाने दुग्धशर्करा योग जुळवून आणला मंडळाचे अध्यक्ष श्री. लीलाधर दत्तात्रय बडगुजर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व समाजाने बडगुजर विद्या प्रसारक मंडळात सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*