??? ।।अमोल सहकार्य ।।???

जळगांव जिल्ह्यातील शिरसाड गावामधील मराठी शाळेमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलेले असे आपल्या बडगुजर समाजातील बांधव हे याच गावात राहत असून एक प्रगतशील सदन शेतकरी म्हणून याच गावात स्थायिक आहे. या शाळेतून शिक्षण संस्कार, शिस्त नम्रता या गोष्टी शिकायला मिळाले. या शाळेसाठी ते नेहमी दरवर्षी कोणत्यां कोणत्या प्रकारे सहकार्य व सहभाग देऊन माजी विद्यार्थी म्हणून मदत करत असत. आज ही ते सपत्नीक दोघेही शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्य उज्वल होण्यासाठी अथक प्रयत्न व मदत करत असतात.
असे महान कार्य करणारे भैय्यासाहेब श्री. प्रकाश डिगंबर बडगुजर व सौ. विजया प्रकाश बडगुजर हे दाम्पत्य यांनी दिं. 07.01.2020 रोजी शाळा दुरुस्ती व शालेय परिसरात पेव्हर ब्लॉक , इत्यादी बसविण्यासाठी 34000/- रुपये चा चेक अशी अनमोल मदत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. या महान अनमोल कार्याचे कौतुक संपूर्ण जळगांव जिल्यात होत आहे व सर्व स्तरावर अभिनंदन करत आहे.
तसेच हे दाम्पत्य आपल्या बडगुजर समाजालाही नेहमी मदत, सहभाग व सहकार्य करत असतात.
या समाज दाम्पत्यांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, युवक समिती आणि प्राऊड ग्रुपतर्फे आपले खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद.


Leave a Reply