मानसिक तनाव आजाराचे मुख्य कारण कसे ? तणाव आणि आजार याचा काय संबंध? – डॉ. घनश्याम बडगुजर, जळगांव

डॉक्टर तणाव आणि आजार  याचा काय संबंध?  असे अनेक पेशंट आम्हाला विचारतात. त्याचे हे उत्तर  उदाहरणासहित.

होमिओपॅथी म्हणते, आजाराच मुख्य कारण. कौटुंबिक चिंता. आर्थिक चिंता .व्यवसायिक चिंता सामाजिक चिंता.  धार्मिक चिंता पारिवारिक दुःख, टेन्शन, तणाव यामुळेच आजार लागतात.

तणावांमुळे रोग प्रतिकार शक्ती कमी होते व शरीरातील वीक अवयव यांना आजार लागतात.

विक अवयव म्हणजे काय? बघू ,समजा एखाद्या व्यक्तीच्या घराण्यात डायबिटीस असेल, म्हणजे त्या व्यक्ती चे स्वादुपिंड ,म्हणजे पेंक्रियाज, हे विक आहे.

अश्या व्यक्तीच्या जीवनात कमी वयात खूप दुःख आले तर अशा व्यक्तीला, जो डायबिटीस अनुवंशिक पणे पन्नासाव्या वर्षी लागणार असतो तो तीस-चाळीस या वयामध्ये लागून जातो.

तसेच सांधेदुखी, दमा तसेच इतर आजार सुद्धा जे खानदानी समजले जातात, ते ताणतणावामुळे कमी वयात लागतात ,सुरुवात होतात, मात्र अशा ताणतणावांवर औषध देऊन होमिओपॅथी ते नक्कीच बरी करता येतात.

तणावामुळे  किंवा  वातावरणातील बदलांमुळे रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे वेगवेगळे व्हायरस बॅक्टेरिया शरीरात कार्य करू शकतात .

किंवा विशिष्ट इमोशन चा विशिष्ट अवयवांवर परिणाम होऊन आजार लागतात. उदा. दुसऱ्या व्यक्तीची प्रगती सहन होत नाही, ईर्ष्या वाटते, जलन वाटते, त्यामुळे हृदय जळते व  हार्ट अटॅक येतो ,

दुसरे, कमी वयात खूप मोठे उद्दिष्ट घेऊन ,खांद्यावर बोजा घेऊन, जगणाऱ्या व्यक्तीला मणक्याचा ग्याप होतो. म्हणून आज तरुण मुलांना स्पॉंडिलायसिस होताना दिसतात.

आणि हे सत्य गृहीत पकडूनच होमिओपॅथीमध्ये हे औषधे निवडली जातात. म्हणून आजार मुळासहीत बरे होतात.
कुठेही घ्या होमिओपॅथी औषध पण त्या होमिओपॅथिक डॉक्टरांना तुमच्या जीवनातील दुःख जरूर सांगा, तरच तो बुद्धिवंत डॉक्टर तुम्हाला बरं करू शकेल, नसेल तर नाही . नाही . नाही.

बऱ्याच वेळा पेशंटच्या सोबत असलेल्या लोकांसमोर काही सिक्रेट गोष्टी सांगता येत नाही. अशा वेळेस डॉक्टरांच्या मोबाईल वर ती गोष्ट, दुःख सांगून डॉक्टरांना ,जरूर मदत करावी औषध निवडण्यासाठी.

उदा .प्रेमभंग झाल्यामुळे ,अनेक मोठमोठे, असाध्य आजार लागतात आणि ह्या कारणावर औषध दिल्याशिवाय तो पेशंट बरा होत नसतो जगात. नवरा बायकोचे ,सासू-सासर्‍यांचे विचित्र स्वभाव. फोनवर सांगा. सांगावेच लागेल ,नसेल तर बरे होणार नाही तुम्ही .

तसेच प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यामुळे ,अपमानामुळे अनेक आजारांना जन्म मिळतो व ते डॉक्टरांना सांगावे.

दुःख सांगावच लागेल. आमच्या सांगण्यावर अनेक लोकांचा विश्वास बसणार नाही .की मानसिक तान तनाव मुळे शारीरिक आजार लागतात .

याची काही उदाहरणे आपण घेऊ या .एकाच घरात दहा लोक राहतात. एकाच छताखाली. एकाच हवेतील वातावरणात. एकच प्रकारचे अन्नद्रव्य म्हणजे. सर्वांना घरात जे ,जेवण तयार  केले जाते  ते  घरातील सर्व लोक, तेच अन्न खातात. घरातील पाण्याचा स्रोत म्हणजे, विहिरीचे  ,नदीचे ,  ट्यूब वेल ,सर्वांना सारखा असतो .

पण घरातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे आजार लागतात. ते सारखेच अन्न खात असल्यामुळे, कुणाला ऍसिडिटी होते ,कुणाला मुळव्याध ,कोणाला किडनी स्टोन, कोणाला गॉल ब्लेंडर चा स्टोन, कोणाला कातडीची अलर्जी, कोणाला डोकेदुखी , कोणाला थायराइड ,कोणाला मणक्यातील गॅप, कोणाला सांधेदुखी, कोणाला हार्ट अटॅक , कोणाला पॅरलिसीस, कोणाला किडन्या फेल, कोणाला कॅन्सर, कुणाला दमा , सर्व लोक एकाच घरात, सर्व गोष्टी जवळजवळ समान आहे

मित्रहो येथे विचार करण्यासारखा प्रश्न आहे . हा आहे की,  ही लोक एकाच घरात, एकाच छताखाली एकाच वातावरणात, रोज बनवले जाणारे घरातील वेगवेगळ्या भाज्या, जेवण खाता. तरीही यांना वेगवेगळे आजार कसे ?

खाण्यापिण्याचा दोष असता तर सर्वांना एकच आजार लागले असते. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे याव्यतिरिक्त कारण वेगळे आहे.

जवळजवळ सेम कंडिशन मध्ये ते लोक राहतात, जगतात ,तरीही आजार वेगवेगळे का लागले त्यांना,?
त्या अन्नाचा दोष असता म्हणजे ,टमाटा ,गोबी ,दूध बोरिंग चे पाणी ,यांचा दोष असता तर सर्वांना किडनी स्टोन झाला असता .पण तसे होत नाही.

कुणाला ऍसिडिटी होते ,कुणाला काही तर ,कोणाला काही. आजार प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या संकटांमुळे वेगवेगळी मानसिक दुःख निर्माण झालेले असतात. आणि त्याचा परिणाम शरीरावर आजाराच्या रुपाने आलेला असतो

दुसरे उदाहरण एकाच हॉलमध्ये दहा विद्यार्थी झोपतात किंवा परिवाराचे उदाहरण घ्या, त्या सर्वांना रोज मच्छर चावतात ,सर्वांच्या अंगावर मच्छर चावल्याच्या खुणा दिसतात .म्हणून काही सर्वांनाच मलेरिया होत नाही .किंवा डेंगू किंवा चिकनगुनिया किंवा डासांपासून होणारे आजार होत नाही.

तर तणावामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे ज्‍यांची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्यांनाच मलेरिया किंवा  डासांपासून होणारे आजार होतात.

एकाच होस्टेलला शंभर मुले राहतात ते एकाच पाण्याचा स्रोताचा वापर करतात म्हणून खराब पाण्यामुळे सर्वांनाच टायफाईड होत नाही किंवा वॉटर बॉर्न डिसीज उदा  डायरिया,  कॉलरा  इत्यादी होत नाहीत हे नोंद करण्यासारखी गोष्ट आहे.

सारांश:- असा आहे की ,आजाराचे कारण रोग प्रतिकार शक्ती कमी होणे आहे .जी मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या ताणतणावामुळे, दुःखामुळे ,कमी होऊन वेगवेगळे आजार लागतात .जरी सारखे वातावरणात, सेम खाणेपिणे, सेम कंडिशन मध्ये ,लोक रहात असले तरी. हे या उदाहरणावरून सत्यापित होत आहे.

डॉ. अरुण पाटील. पुणे .डॉ.पालेस्टे .औरंगाबाद .डॉ. सुदेश सांखला  .भुसावळ. डॉ प्रशांत एमडी व श्रेया जळगाव. डॉ. घनश्याम बडगुजर .स्वातंत्र्य चौक. जळगाव .9420391922. व संपूर्ण होमोपॅथिक जागृती मंच द्वारा. मानवजातीच्या कल्याणासाठी, दुःख मुक्तीसाठी .हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर सर्व भाषेत पाठवा .समाजप्रबोधन करून, दुःख मुक्तीसाठी एक पाऊल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*