उबदार कपडे वाटप करून शनशाईन स्टार किड्स स्कूल ने जपली सामाजिक बांधिलकी

आपण वापरत नसलेली, पण सुस्थितीत असलेली उबदार कपडे डोनेट करण्यासाठी सनशाईन स्टार किड्स, प्रीस्कूल अँड डे केअर सेंटर, यांच्याकडून  आव्हान करण्यात आले होते, आव्हानाला प्रतिसाद देत पालक वर्ग व कोणार्क नगर (जत्रा हाॅटेल) परिसरातील नागरिकांनी उबदार कपडे व ब्लांकेट्स डोनेट केलीत.

हिवाळ्यात थंडी पासून बचाव करता यावा यासाठी सनशाइन किड्स प्रीस्कूल कडून जत्रा हॉटेल परिसरात गरजू मुलांना व महिलांना उबदार कपडे व ब्लँकेटचा वाटपाचा उपक्रम रविवार, दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले.

या उपक्रमा प्रसंगी संचालिका स्वाती प्रशांत बडगुजर, प्रशांत प्रकाश बडगुजर, त्याचप्रमाणे पालकवर्ग जयश्री माळी, वैभव भंगरे, धनश्री भंगरे, संजीवनी पवार, निता घुगे मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या उपक्रमाच्या माध्यमातून सन शाइन स्टार किड्स यांनी जत्रा हॉटेल परिसर व कोणार्क नगर परिसरातील गरीब नागरिकांना आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नागरिकांच्या चेहर्यावर हसू उमटले.

उबदार कपडे व ब्लांकेट्स वाटप करण्याचा उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सनशाईन स्टार किड्स स्कूल मार्फत करण्यात आला आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची काहीतरी देणे आपण लागतो, ही सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सनशाइन स्टार किड्स मार्फत करण्यात आले.

दिलेल्या प्रतिसादाबद्दल सनशाईन स्टार किड्स पालक वर्ग, कोनार्क नगर परिसर रहिवासी, जत्रा हॉटेल परिसर रहिवासी तसेच सर्व डोनर्स चे आभार संचालिका सौ. स्वाती प्रशांत बडगुजर यांनी व्यक्त केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*