साप्ताहीक ‘युवा गर्जना’च्या प्रारंभाला बारा वर्षे पूर्ण झाले असून
आता हे साप्ताहिक १३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही तपपूर्तीची
वाटचाल केवळ आणि केवळ आपल्या सर्व हितचिंतकांच्या,
जाहिरातदारांच्या आणि मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ शकले. म्हणून
आधी आपल्या सर्वांचे जाहीरपणे आभार मानतो. आपण सर्वांनी
पाठबळ दिले आणि विश्वास वाढवला म्हणूनच सप्ताहिक युवा गर्जनाला १२ वर्षाची वाटचाल करणे शक्य झाले. वास्तविक वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड चिंताजनक बातावरण बनले आहे. घटलेला जाहिरातींचा ओघ, शासनाकडून जाहिरातींचे मिळणारे तुटपुंजे सहकार्य आणि व्यापारी व व्यावसायिकांनी तसेच जनतेनेसुद्धा वृत्तपत्राकडे फिरवलेली पाठ, याचा परिणाम प्रत्येक दैनिकाला आणि प्रत्येक साप्ताहिकाला भोगावा लागत आहे. विभागीय बल्या वृत्तपत्रांचे काय आणि नंदुरबार सारण्या जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे काय, दुखणे आणि चिंता एकसारख्याच बनल्या आहेत. आवक घटली म्हटल्यावर वृत्तपत्रांना स्वतःचा खर्च काढणे अशक्य बनले आहे. दैनिक चालवणे किंवा साप्ताहिक चालवणे म्हणजे अकारण हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. स्वत:चा खर्च निघत नाही म्हटल्यावर नफा राहणे किंवा फायद्यात राहणे दरचीच गोष्ट बनली आहे. असे असूनही अनेक जण या क्षेत्रात का थांबून आहेत? हा प्रश्न अनेकांना पडतो.
परंतु यात गहन विचार करण्यासारखे काहीच नाही. उत्तर सोपे
आहे. मनातली आवड, जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची उमेद,
एखाद्या क्षेत्राला समर्पित होऊन सेवा देण्याची प्रचंड ताकतीची इच्छा,
झपाटलेपणा (जुनून) फार विचित्र असतो. तो माणसाला कधीही
दुःखाची, वेदनांची किंवा साहित्य साधनांच्या कमतरतेची जाणीव
होऊ देत नाही. वाटेवर कितीही काटे बोचले तरी चालत राहण्याचे
सुचवत रहातो, बळ देत रहातो. युवा गर्जनाच्या वाटचालीचे हेच
गमक आहे. पैसा कमावण्यासाठी किंवा दहशत माजवण्यासाठी युवा
गर्जना स्थापन झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्याच्या, नंदुरबार शहराच्या
प्रश्नांना हात घालता यावा, विकासात्मक गोष्टींना प्रसिद्धी देता यावी,
सकारात्मक दृष्टिकोन नागरिकांना प्रेरित करीत राहावा या दृष्टिकोनातून साप्ताहिक युवा गर्जनामधून सकारात्मक वृत्त प्रसारणाचे काम सातत्याने केले जात आहे. अकारण कोणाला त्रास देणे, बदनाम करणे किंवा धाकदपटशा दाखवून पैसा कमावणे, या प्रकारची पत्रकारिता युवा गर्जनाच्या माध्यमातून झालेली नाही. याला कारण आपण सर्व वाचक आणि आमचे हितचिंतक मित्र कारणीभूत आहेत. आपणा सर्वांचा आदरयुक्त वचक आमच्या कामावर राहिला आहे आणि तो तसाच पुढेही राहील याची आजच्या वर्धापन दिनानिमित्त ग्वाही देतो. आमच्या गळ्यात नंदुरबारचे लाडके नेते माननीय श्री.चंद्रकांतजी रघुवंशी आणि आमच्या राजकीय मित्रांच्या आशीर्वादामुळे स्वीकृत नगरसेवकपदाची माळ नुकतीच पडली आहे. सत्ताधारी गटात समवेत लोकहिताचे काम करण्याची संधी मला दिली गेली आहे, याबद्दल त्या मित्रगण व समाज बांधवांसह सर्वांचे जाहीर आभार मानतो. याचा उल्लेख मुद्दाम येथे करुन एक संपादक या नात्याने असेही नमूद करतो, की साप्ताहिक युवा गर्जना निपक्षपणे बातम्या देणे मात्र चालूच ठेवेल. आमच्या सकारात्मक पत्रकारितेला आपले बळ लाभत राहील, अशी अपेक्षा करुन पुन्हा एकदा सर्वाचे या वर्धापन दिनी आभार मानतो.
श्री.दिलीप राघो बडगुजर, संपादक, युवा गर्जना, नंदुरबार


“युवा गर्जना” 12 व्या वर्धापनदिनाच्या
? ! मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! ?
माननीय संपादक व युवा गर्जनाची संपूर्ण टीमचे
? ! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ?
युवा गर्जना ला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा