महाराष्ट्र राज्य रोल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत कु. खुशी विजय बडगुजर चे घवघवीत यश – श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, शिरपूर

महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन पुणे मार्फत नाशिक जिल्हा Amature रोल बॉल असोसिएशन व मराठा हायस्कूल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्हा रोल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धा नाशिक येथील मराठा हायस्कूल येथे 29 डिसेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत मराठा वॉरियर या संघातून कु. खुशी विजय बडगुजर हिने मुलींसाठी असलेल्या रोल बॉल स्पर्धेत भाग घेऊन तिसरा क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे. ती नाशिक येथील श्री. विजय बाबूलाल बडगुजर यांची सुकन्या असून अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती चे उपाध्यक्ष श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर , शिरपूर यांची नात आहे. श्री. प्रविण गोपीचंद रघुवंशी सर, सदस्य, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती यांच्या साडूची मुलगी आहे. तिचे आजोबा श्री. बाबूलाल ओंकार बडगुजर, आई सौ. शोभा विजय बडगुजर व नाशिक जिल्हा रोलबॉल असोशियनचे संचालक यांचा तिच्या यशात सिंहाचा वाटा आहे.

कु. खुशी हिस श्री. मोहन हिरालाल बडगुजर, अध्यक्ष,अ. भा. ब. समाज कल्याण समिती यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छूक :
अ. भा. ब. स. कल्याण समिती
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप


2 Comments

  1. ? ? !!! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!!? ?
    ? व यापुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*