बडगुजरांचा उगवता तारा – लकी बडगुजर – The New Rising Star… – लोकेश कोतवाल, पुणे

लकी बडगुजर हे येत्या ७ फेब्रुवारीला “रहस्य” या चित्रपटाव्दारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. लकी हे अाकुर्डी पुणे येथे राहत असुन, मुळचे धुळे येथील रहीवासी आहेत. ते धुुुुळे येथील श्री. जगदीश सिताराम बडगुजर यांचे चिरंजीव व कै. सिताराम ओंकार बडगुजर यांचे नातू आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळे येथील सेंट झेवियर कनोसा कॉनव्हेंट हायस्कूल मध्ये झाले आहे. त्यानंतर डिप्लोमा (मेकॅनिकल), बी. ई.(मेकॅनिकल) इंजिनिअरींग व एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) पर्यंतचे उच्च शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठातून नुकतेच पूर्ण केले.

लकी बडगुजर

इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी (बावधान) पुणे येथे आयोजित ऑडिशन मध्ये सहभाग घेतला व त्यात त्यांची या चित्रपटात प्रमुख भुमीकेसाठी निवड झाली.

लकी यांस अभ्यासाबरोबरच कला क्षेत्राचीही खूप आवड होती. लकी शाळेत कॉलेजात विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमात, कॉलेज गॅदरिंग मध्ये आपल्यात दडलेले विविध कलागुण दाखवित असे. बऱ्याचदा त्याला या कला गुणांसाठी बक्षिसेही मिळालेली आहेत. आपल्या अभिनय कौशल्या मुळे त्याला आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रमुख भुमिका मिळाली. या चित्रपटाची शूटिंग सातपुडा पर्वताच्या भागात झालेली आहे. हा चित्रपट एक हॉरर पट आहे. प्रत्येक नविन रात्र ही रहस्याला जन्म देत असते, अशाच एका रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा भावेश प्रोडक्शन चा रहस्य हा चित्रपट दि. ७ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे टायटल सॉंग हे बॉलिवुडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने गायले आहे.

सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान सोबत लकी बडगुजर


तर गणपतीचे गाणे मराठी चे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे.

सुप्रसिद्ध गायिक आनंद शिंदे सोबत लकी बडगुजर

तसेच लव सॉंग प्रेम कोतवाल यांनी गायले आहे.

नुकताच पुणे येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते भावेश प्रॉडक्शन निर्मित रहस्य या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. या चित्रपटाचे लिखाण, प्रोडक्शन व दिग्दर्शन हे भावेश दिनेश पाटील यांनी केले आहे. सह प्रोड्युसर माधुरी वडाळकर आणि दिनेश पाटील तसेच एक्झिकेटिव्ह प्रोडूसर गिरीश सूर्यवंशी GRS फिल्म यांचे सहकार्य लाभले. या चित्रपटाचे गाने अाणी ट्रेलर झी म्युझिक कंपनी कडुन रीलीज होणार अाहेत.

या चित्रपटाचे ट्रेलर हे ७ जानेवारी 2020 रोजी मुंबई येथे रिलीज केले जाणार आहे. या चित्रपटाची आतुरता ही शिगेला पोहचली असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आपल्या समाजातील एक उगवता तारा लकी बडगुजर हा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. हा चित्रपटात सर्वांनी आवर्जून पहावा. तसेच आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व आप्तेष्टांना सुद्धा याविषयी माहिती देऊन हा चित्रपट सुपरहिट कसा होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. लकी बडगुजर आणि त्याच्या संपूर्ण टीमला वेब पोर्टल टिम तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दि. ७ फेब्रुवारीला बडगुजर समाजबांधव न उलगडणाऱ्या रहस्याचा शोध घेण्यासाठी हा चित्रपट बघायला नक्कीच जातील.

शुभेच्छूक : अ. भा. ब. स. महासमिती, अ. भा. ब. स. ओ. बी. सी समिती, अ. भा. ब. स. कल्याण समिती अ.भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व समस्त वेब पोर्टल टिम

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*