नाना गणिती संकल्पना ज्यांच्या मनावर राज्य करत असत. पाटी, वहि किंवा कागदी कपत्यांवर गणिताची उत्तरे मांडणारा अवलिया .रस्त्यावरील रद्दी कागद घरी आणून निळ्या शाही ने लिहिलेल्या कागदावर लाल शाही ने आपली प्रमेय लिहिणारा .’जादूचा चौरस’ हा त्याचा आवडता उद्योग होता . शुद्ध शाकाहारी व एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या या कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्याने एकदा वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांनाच शून्य केळी शून्य मुलांना वाटल्यास प्रत्येक मुलास एकच केळे मिळेल का? असा प्रतिप्रश्न केला.
मग मित्रांनो मीही तुम्हाला हाच प्रश्न विचारतो .मला सांगा शून्याने शून्याला भागले असता काय उत्तर येईल ? कोण सांगत ? बरोबर, शून्य ,उत्तर येईल कारण मी ही तुमच्याप्रमाणे शिकलो आहे. परंतु कोटीबुद्धी बाल गणिती श्रीनिवास रामानुजन यांनी या प्रश्नाचे उत्तर “अनंत “येते ,हे साडेसातशे वर्षांपूर्वी भास्कराचार्य यांनी केलेल्या शोधाच्या आधारे सांगितले.
ज्यांची गणिती बुद्धी गुरुच्याही पुढे सतत झेप घेत असे. मग ते तामिळनाडू असो कि केंब्रिज विद्यापीठ असो वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी लोणची त्रिकोणमिती आत्मसात केली 15 व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शुब्रिजकार यांचे लेख वाचून अनेक सिद्धांत मांडले .मात्र मॅट्रिक परीक्षेत पहिले आलेले रामानुजन महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी आजच्या शिक्षण पद्धती प्रमाणेच इंग्रजी इतिहास व शरीर शास्त्र या विषयात नापास होऊन बळी ठरले. हीच मोठी या देशाची शोकांतिका आहे . नापास झालेल्या रामानुजनचे आई वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीशी लग्न लावून दिले आणि शेवटी संसारिक जबाबदारीत गुंतवून टाकले . संसार चालविण्यासाठी तडपत्या गणिती बुद्धीने मुग्ध झालेल्या रामानुजन यांना 25 रुपये महिन्याच्या पगारावर कारकून म्हणून काम करावे लागले.
हुशार मुलांची संशोधन वृत्ती खरे शिक्षकच जाणत असतात. त्यांच्याच मदतीतून व शिक्षण तज्ञांच्या मदतीतून रामानुजन यांना मद्रास विद्यापीठाची 75 रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली व नोकरीवरून दोन वर्षाची रजा मिळाली.
रामानुजन यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या जी एच हार्डी यांना अविभाज्य संख्या, अतिगुणोत्तर मालिका ,मॉड्यूलर फंक्शन , इव्हन मॅजिक नंबर ,ईलिप्स जॉमेट्री टेबल, रोमन टेबल ,हायपर जॉमेट्री टेबल ,यावरील एकवीस उदाहरणांचे पत्र लिहिले. मात्र योग्य प्रशिक्षण व उत्तम दर्जाचे ग्रंथालय न मिळाल्यामुळे त्यांच्या ज्ञानातील वैगुण्य सुद्धा आश्चर्यकारक होते .हार्डीनी त्यांना इंग्लंड ला बोलावून घेतले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला अजून नवे पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून 4000 सूत्रे मांडली .त्यातील दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत बरीचशी बरोबर आहेत .आजही त्या सूत्रांवर जगातील अनेक विद्यापीठात संशोधन सुरू आहे .
अत्यंत कमी म्हणजे बत्तीस वर्ष आयुष्य लाभलेल्या रामानुजन यांनी आर्थिक शैक्षणिक व शारीरिक प्रतिकूल परिस्थितीत आपले आयुष्य गणितासाठी खर्च केले .शाकाहार आणि इंग्लंड मधील हवामान न मानवल्यामुळे त्यांना क्षयरोग जडला. त्यातच त्यांचे निधन झाले. अंकशास्त्र थिटा फंक्शन आणि अनंत मालिका यात त्यांचे मोठे योगदान आहे .त्यांच्या 22 डिसेंबर या जन्म दिनानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन .
खरे तर त्यांच्यासारख्याच इंग्रजी विषय नापास झालेल्या आणि आपले शिक्षण अर्धवट सोडणार्या मात्र दुसर्या एखाद्या विषयात पारंगत असलेल्या मुलांचा शासनाने नक्कीच विचार करावा हीच खरी विनंती. मुलांना योग्य प्रशिक्षण व उत्तम दर्जाचे ग्रंथालय जर मिळाले तर त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात .मात्र शासन यासाठी कुठलीच तजवीज करत नाही. शाळेतील पाठ्यपुस्तकांमधिल पाठा
साठी पूरक संदर्भ पुस्तके ग्रंथालयात नसतातच. नव्हे शाळेत ग्रंथालयच नसते .मग आमच्या मुलांची बुद्धी पारंगत कशी होईल बर? आईवडिलांनी सुद्धा मुलांच्या येणाऱ्या नैराश्य( नापास होण्याचे ) समजून घ्यावे व त्याला आवडणाऱ्या विषयास संशोधक वृत्तीने नवनिर्मिती करण्यास सहकार्य करावे. ही विनंती .रामानुजन यांच्या या कथेतून वरील मुद्दे समजले तरच ही त्यांना खरी आदरांजली ठरेल
धन्यवाद आपलाच… प्राध्यापक मिलिंद चिंधु बडगुजर ..(9421184495)


Leave a Reply