लिटल चॅम्प इंग्लिश मेडीयम स्कूल, पिंप्री खुर्दll ता. धरणगांंव येथे महिला पालक वर्गासाठी पाक कला स्पर्धेचे यशस्वी आयोजन

शाळेतील लहान मुलांना पौष्टीक आहाराचे महत्वःमहिलापालक वर्गाची पाक कला स्पर्धा. लिटल चॅम्प इंग्लिश मेडीयम स्कूल, पिंप्री खुर्दll तालुका धरणगाव येथे शनिवार दिनांक 21/12/2019 रोजी “महिला पालक वर्गासाठी पाक कला स्पर्धा”आयोजित करण्यात आली होती. शाळेतील लहान मुलांना “पौष्टिक आहार देणे किती गरजेचे?” हा स्पर्धेचा मुख्य हेतू होता. आणि याच निमित्ताने महिलांमध्ये असलेल्या कलेला वाव मिळावा, तसेच डिसेंबर महिना हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या यावेळी सहज उपलब्ध असतात. हाच विचार ठेऊन ही स्पर्धा आयोजित केलेली होती. सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन पौष्टिक डिश तयार केलेल्या होत्या.

यावेळी प्रथम तीन स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. स्पर्धेचं आयोजन लिटल चँप स्कूल, प्राचार्या सौ.शुभांगी बडगुजर यांनी केले, पिंप्री गावातील व परिसरातील बडगुजर महिला पालकांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.
संस्थाध्यक्ष श्री.राजेंद्र बडगुजर व सचिव श्री. गणेश साळुंखे यांनी सदर कार्यक्रमास प्रोत्साहनात्मक सहकार्य केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*