तु सुंदर नसशिल इतरांसाठी पण
तुझ्या नवऱ्याला तर तु आवडते
मग का कुणाच मनावर घेते ?
तु महत्वाची नसशील कुणासाठी
पण मुलांच तर तु सर्वस्व असते.
मग का कुणाच मनावर घेते ?
तु आळशी असशील इतरांसाठी
पण तुझ्या आईला तर मेहनत
तुझी कळते.
मग का कुणाच मनावर घेते ?
तु उद्धट असशील इतरांसाठी
पण तुझ्या पप्पांना तर तुझी सालसता कळते.
मग का कुणाच मनावर घेते ?
तुझी चॉईस नसेल चांगली
इतरांसाठी,
पण तुझ्या भावाला मात्र तिच आवडते .
मग का कुणाच मनावर घेते ?
तु मठ्ठ असशील इतरांसाठी
पण तुझी बहिण आजही तुझचं कौतुक करते.
मग का कुणाच मनावर घेते ?
तुझा स्वभाव चांगला नसेल इतरांसाठी,
पण तुझ्या खऱ्या मैत्रीणींना तर त्याचीच भुरळ पडते.
मग का कुणाच मनावर घेते ?
तु गारगोटी असशील इतरांसाठी,
पण विसरू नको तुझं ते जग,
जिथे ‘हिरा’ आहेस तु कायमसाठी.
म्हणुन म्हणते सोडून दे रडणे, कुढणे
आणि जग आनंदाने स्वतःसाठी.
तुझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांसाठी.
सर्व प्रेमळ महिलांसाठी
????????


खुप छान कविता ! अभिनंदन !!
???