कढोली ग्रामपंचायत सरपंचपदी 27.11.2019 रोजी सौ. यमुनाबाई प्रकाश बडगुजर यांची आज निवड – श्री. ललित बडगुजर, जळगांव

कढोली येथील रहिवासी सौ. यमुनाबाई प्रकाश बडगुजर यांची नुकतीच कढोली ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाली. त्या श्री. प्रकाश रामचंन्द्र बडगुजर (माजी सोसायटी चेअरमन) यांच्या अर्धांगिनी आहेत. तसेच त्यांना दोन मुले आहेत. गोविंदा प्रकाश बडगुजर आणि जितेंद्र प्रकाश बडगुजर. गोविंदा बडगुजर यांचे गावातच किराणा दुकान आहे आणि जितेंद्र भाऊ हे अ. भा. ब. स. युवक समितीचे सदस्य आहेत. श्री. प्रकाश शेठ यांचा शेती हा मुळ व्यवसाय असून त्यांना समाजकार्यात पण रुची आहे.

कढोली ग्रामपंचायत ची लढत ही चुरशीची होती. सौ. यमुनाबाईनी त्यांच्या विरोधकांवर त्यांनी 6 विरुद्ध 2 मतांनी विजय मिळविला. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजातील सर्व सदस्य यांनी सौ. यमुनाबाईंच्या बाजूने मतदान केले ही अभिमानस्पद बाब आहे.

समाजातील एकता ही आपल्याच समाज बांधवाला उच्च पदावर पोहचवू शकते आणि तोच समाज बांधव आपल्या समाजासाठी उपयुक्त ठरतो. म्हणून असेच आपण आपल्या लोकांना सहकार्य करत रहावे. कढोलीकरांनी हा अनमोल संदेश दिला आहे.

नव निर्वाचित कढोली ग्रामपंचायत सरपंच सौ. यमुनाबाईंचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

शुभेच्छूक :
बडगुजर प्राऊड ग्रुप,
अ. भा. ब. स. युवक समिती

नवनिर्वाचित सरपंच सौ. यमुनाबाई यांचा सत्कार करतांना ग्रामविकास अधिकारी

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*