अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती कार्यकारणी सभेचे कुर्हे पानाचे येथे आयोजन
मा.श्री/सौ. – सर्व कार्यकारणी सदस्य, अ. भा. ब. स. महासमिती
आपल्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांची सभा महासमितीचे अध्यक्ष श्री. माधवराव जानकीराम बडगुजर यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि. ८/१२/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर कुर्हे पानाचे ता. भुसावळ जि. जळगाव, येथे खालील विषयावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
….सभेचे विषय…
१) मागील सभेचे प्रोसेडींग वाचून कायम करणे.
२) आज अखेरच्या जमाखर्चास मंजूरी देणे.
३) नुतन अध्यक्षांना बँकेच्या आर्थिक व्यवहार करणेस मंजूरी देणेबाबत.
४) मा. धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नविन अध्यक्षांची निवड झाल्याबद्दल फेरफार प्रस्ताव दाखल करणे,
५) वधु-वर परिचय पुस्तिका संदर्भात कामकाजाचा आढावा घेणेबाबत.
६) अध्यक्ष परिषद घेणेविषयी चर्चा करणेबाबत.
७) मा. अध्यक्ष सोा. यांचे परवानगीने आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करणे.
टिप:
१) कोरम अभावी सदरची सभा तहकुब झाल्यास त्याच ठिकाणी विषयसुचीप्रमाणे सभा घेण्यात येईल. त्यास कोरमचे बंधन राहणार नाही. (सभास्थळी भोजन व्यवस्था केली आहे.)
सभेचे ठिकाण व वेळ :
रविवार दि. ८/१२/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता
रेणूका माता मंदिर, जळगाव रोड, कुन्हे पानाचे ता. भुसावळ जि. जळगाव
मोबा. ९४२१५३७६५१, ९७६७३३७४५७.
नोंद – सदर बातमी महासमितीच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Leave a Reply