स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार२०१९जाहिरआसू दि.: राष्ट्रबंधू शहिद राजीवभाई दिक्षीत, यांच्या जयंती व पुण्यतिथीदिना निमित देश प्रेमवार काव्य लेखन स्पर्धा, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा व प्रकाशित पुस्तक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यास्पर्धांच्या निमिताने विजेत्या स्पर्धकास ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०१९ गौरवण्यात येणार आहे.
काव्य लेखनात श्री. निंबा पुना बडगुजर एरंडोल जि. जळगाव यांची ‘कारगीलचा इतिहास प्रथम, सौ. निलम मोहन बाजी मोहिते, मोळ, ता. खटावयांची, ‘पावन भूमी’ द्वितीय, कु. वैष्णवी रावसाहेब वाणी, कन्या विद्यालय शिर्डी, यांची,’भारत माता’, तृतीय, आणि कु. सानिया पिरमहमद मनियार, कन्या विद्यालय शिर्डी व कु. साक्षी तानाजी भिवरकर, श्रीमान धन्यकुमार गांधी विद्यालय धुळदेव यांना उत्तेजनार्थ क्रमांकदेण्यात आला आहे. निबंध स्पर्धेत सौ. अंजली शशिकांत गोडसे, सातारा, प्रथम, सौ. सिमा सुरेश पार्टे, जि.प. शाळा महू, ता. जावली,सातारा, द्वितीय, सौ. सिमा शिरीष गांधी,पुणे, तृतीय, आणि कु. अक्षदा सुनिल कोते व कु.आरती जनार्दन वाकचौरे, कन्याविद्यालय शिर्डी यांना उत्तेजणार्थ क्रमांक देण्यात आला आहे. प्रकाशित पुस्तक काव्यविभागात,डाॅ. सिमा आनंद, बारामती, ‘स्वप्न फुले’ प्रथम, श्री.ज्ञानेश्वर बडवे, शिखर शिंगणापूर, ‘पुष्प राशी’ द्वितीय, विद्या सरपाते,पोलीस पाटील, गुंजखेड लोणार, ‘गावगाडा’ व श्री.ओंकार राठोड,वडगाव गाढवे, यवतमाळ,’बालहर्ष’ तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. प्रकाशित पुस्तक विभागात श्री. शिवाजीराव जाधव, मार्डी, ता. माण, ‘झुंज’ प्रथम, श्री. ताराचंद आवळे, फलटण, ‘संघर्ष’ द्वितीय, श्री. सिराज बाबालाल मोमिन,कराड, ‘कर्मवीर’ तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.
राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी संपन्न होणार्या ‘स्वदेशी साहित्य संमेलनात’ विजेत्या स्पर्धकास “स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०१९” देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत, व संमेलनात सहभागी होणार्या साहित्तीकास प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसू, ता. फलटण, जि. सातारा येथे शनिवार दि.३० नोव्हेंबर२०१९ रोजी सकाळी १०.३०वाजता सुरु होईल. तरी सर्व साहित्तीकांनी सहभागी होऊन कार्यक्रास हजर राहावे अशी विनंती श्री.प्रकाश सकुंडे, गुरुजी यांनी केली आहे. संपर्कासाठी भ्रमन ध्वनी ९८८१०३७४९१ वर संपर्क साधावा हि विनंती.

Leave a Reply