कवी श्री.निंबा पूना बडगुजर यांना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर

मुळगांव बोरनार, ह.मु.एरंडोल येथील साईनगर रहीवासी कवी निंबा पूना बडगुजर संचालक औदुंबर साहित्यिक रसिकमंच व संचालक सुर्योदय जेष्ठ नागरिक संघ एरंडोल यांना यंदाचा स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०१९चा जाहीर झालेला आहे. स्वदेशी भारत बचत गट मु.आसू ता. फलटण जिल्हा.सातारा यांच्या तर्फे राजूभाई दिक्षित यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने देशभक्ती पर काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात निंबा बडगुजर यांनी “कारगिल इतिहास” ही स्वलिखीत कविता पाठवून स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. “कारगिल इतिहास” या कवितेची निवड होऊन त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला असून दिनांक ३०/नोव्हेंबर २०१९ रोजी आसू जिल्हा परिषद शाळा येथे मान्यवरांच्या शुभहस्ते देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा मानवाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे चाहते कवी, साहित्यिक, जेष्ठ नागरिक, अध्यक्ष मंडळी व अखिल भारतीय बडगुजर समाज ओबीसी समिती उप प्रमुख- एस्.एम्.बडगुजर आणि वेब पोर्टल टीम यांचे कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! श्री.एस्.एम्.बडगुजर,डोंबिवली(मुंबई)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*