कल्याण येथील पद्माकर संपत बडगुजर यांची इन्शुरन्स इंस्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबई तर्फे अर्मेनिया ( रशिया ) येथील बॅंक अधिकार्यांच्या संमेलनासाठी निवड झाली असुन ते १९ ते २४ तारखे पर्यंत असणार्या संम्मेलनासाठी रवाना झाले आहेत. पद्माकर बडगुजर यांनी इन्शुरन्स इंस्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबई येथुन असोसिएट केले असुन आय. आय.एम. लखनऊ येथुन मॅनेजमेंट केलेले आहे,त्यांनी ओम कोटक महिंद्रा,बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स,बजाज अलायन्स,एस बि आय लाइफ इंश्योरेंस,कॅनरा एच. एस. बि. सी. लाइफ इंश्योरेंस आदि MNC मध्ये झोनल मॅनेजर पदावर कार्य केले असुन बॅंक अॅश्युरन्स ह्या नविन प्रणाली चे ते फाउंडर मेंबर आहेत त्यांना ह्या क्षेत्राचा १५ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असुन त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत,सध्या त्यांची स्वताची ट्रेनिंग कन्सलटंसी असुन ते इन्शुरंस इन्सटिट्युट आॅफ इंडिया मुंबई च्या पॅनल वर मानद सदस्य आहेत, बॅंक अॅश्युरन्स ह्या विषयावर अनेक मॅनेजमेंट कॉलेज तसेच सर्व लाइफ इंश्योरेंस कंपन्या आपल्या अधिकार्यींना मार्गदर्शन,ट्रेनिंग देण्यास त्यांना आमंत्रित करतात.


Thank You