सौ. सारिकाताई व श्री. महेंद्र पवार या बडगुजर दाम्पत्याची राज्यपालांना सदिच्छा भेट, शेतकऱ्यांना अधिक मदत करण्याचे केले आवाहन

महाराष्ट्र राज्यातील ओला दुष्काळामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलेली मदत पुरेशी नसून ती वाढवून द्यावी. यासाठी सौ. सारिकाताई महेंद्र पवार, श्री. महेंद्र पवार या दाम्पत्याने राज्यपालांना भेटून केले मदतीचे आवाहन.

महाराष्ट्राचे महामहिम *राज्यपाल *मा.श्री.भगतसिंह कोश्यारी* यांचे समवेत राजभवन महाराष्ट्र मुंबई येथे राज्यातील ओल्या दुष्काळा बाबत व शेतकरी कर्ज माफी तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करून शेतकऱ्यांना अजून मदत मिळावी, दिलेली मदत ही पुरेशी नाही म्हणून विनंती केली. त्यावर राज्यपालांनी अजून आर्थिक मदत लवकरच जाहीर करू असे सांगितले.

राज्यपालांशी चर्चा करतांना सौ. सारिकाताई व श्री. महेंद्र पवार

सौ. सारिकाताई एक कुशल समाज सेविका असून त्या राजकीय क्षेत्रात सुध्दा आपला ठसा उमटविला आहे. त्या
भाजपा महिला मोर्चा पिं. चिं.शहर च्या सरचिटणीस आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भुमिका ही फार महत्त्वाची होती. व त्यांनी मिळालेली जबाबदारी अगदी कुशलतेने पुर्ण केली. त्यांचे बडगुजर समाजातील महिला संघटन आणि सशक्तीकरण याला जास्त प्राधान्य देतात. याकरिता बऱ्याचदा समाजातील महिलांना संघटित करून भेटीगाठी करणे, मिटींग घेणे, विविध उपक्रम विषयक माहिती देणे इ. कार्य त्या नेहमीच करीत असतात.

सौ. सारिकाताई पवार या पिंपरी-चिंचवड प्रभागातील बडगुजरांचे उभरते नेतृत्व आहे. अतिशय प्रेमळ स्वभाव, आदरपुर्ण वागणूक, कोणीही मदत मागायला आले तर त्याला ते कधीच निराश करत नाहीत.

सर्वत्र या बडगुजर दाम्पत्याची चर्चा सुरू असून कौतुक ही केले जात आहे. आपल्या या प्रयत्नास लवकरच यश मिळो आणि अशीच आपली समाजहिताची वाटचाल पुढे सुरु रहावी. धन्यवाद.

राज्यपालांचा सत्कार करतांना सौ. सारिकाताई बडगुजर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*