नाथ प्लाझा काॅम्प्लेक्स मधील स्टेट बँकेचे एटीएम भामट्याने फोडले.
जळगांव, ता.१८ नोव्हेंबर १९, महानगरपालिका समोरील नाथ प्लाझा काॅम्प्लेक्स मधील स्टेट बँकेचे एटीएम भामट्याने फोडले. मशीन फोडून कॅश बाॅक्स उघडण्यापूर्वीच सेन्सर्स अलर्ट प्रणालीने स्टेट बँकेच्या हैद्राबाद नियंत्रण कक्षाला संदेश दिला. तेथून जळगांव शहर पोलिस ठाणे आमलदार निलेश बडगुजर यांना दुरध्वनीवरुन घटनेची माहिती मिळाल्यावर गस्तीवर असलेल्या पोलीस गजानन बडगुजर व भास्कर ठाकरे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी काही वेळातच घटना स्थळावर धडकले. पोलीस गाडीचे लाइट्स एटीएम मधून दिसल्यावर चोरटा सावध होऊन लगेचच बाहेर पडताना पोलिसांनी चौकशी करून त्याला ताब्यात घेतले. तोंडाला मास्क बांधलेला, पाठीवर बॅग असलेल्या व्यक्तिची
विचारपूस केल्यावर त्याने मुंबईला जात आहे. पैसे काढण्यासाठी आलो होतो. पण मशीन हँग झाल्याने पैसे निघाले नाहीत, असे सांगितले. गस्तीवर असलेल्या भास्कर ठाकरे व गजानन बडगुजर यांनी त्या चोरट्याचा फोटो काढून घेत ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे नांव विजय बन्सी आहीरे, रा.खेडी बुद्रुक ता.जि.जळगांव येथील रहिवासी असल्याचे सांगितले


Leave a Reply