जळगांंव जिल्हा जैविक विविधता समितीवर श्री. संजय जगन्नाथ बडगुजर यांंची निवड

‌दि.१९ नोव्हे. २०१९ रोजी माननिय जिल्हाधिकारी जळगाव यांचे दलनामध्ये जळगाव जिल्हा जैवविविधता समितीची सभा घेण्यात आली होती,सदर सभेमध्ये जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष यांनी श्री. संजय जगन्नाथ बडगुजर अध्यक्ष मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव यांची अशासकीय संस्था सदस्य म्हणून सर्वसंमतीने निवड केली आहे, जळगाव जिल्हा जैविक विविधता समितीची स्थापना महाराष्ट्र राज्य जैविक विविधता नियम २००८ प्रमाणे करण्यात आली असून सदर समितीद्वारे जळगाव जिल्ह्यातील ११५३ ग्रा.प.च्या गावातील व शिवारातील जैविक विविधतेचे संवर्धन,जैविक घटकांचा निरंतर पणे टिकविणे, त्यांचा वापर आणि प्राप्त होणाऱ्या लाभाचे वाटप तसेच लोक जैविक नोंदवही तयार करणेसाठी मार्गदर्शन व निर्णय घेण्याचे काम करणार आहे.

संजय जगन्नाथ बडगुजर हे गेल्या २५ वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाच्या नैसर्गिक साधन संपत्ती क्षेत्रांत अशासकीय संस्था तसेच यशदा, पुणे येथील प्रवीण प्रशिक्षिक म्हणून काम करीत आहे, संजय जगन्नाथ बडगुजर काढोलीकर यांनी शासकीय कामासोबतच आपल्या बडगुजर समाजासाठी विविध पदावर नाविन्यपूर्ण काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे,त्यांचे निवडीबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती प्रमुख श्री.मोहन हिरालाल बडगुजर,अखिल भारतीय बडगुजर समाज ओबीसी समिती उप प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर, वेब पोर्टल टिम यांचे कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

5 Comments

  1. ? !! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !! ?
    ? ! खुप खुप शुभेच्छा ! ?

  2. श्री. संजय ज. बडगुजर, आपली निवड जळगांव जिल्हा जैविक विविधता समितीवर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ल शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*