जळगांव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास बंडू बडगुजर यांचे व्दितीय पुत्र तथा स्वर साधना संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. संजय बडगुजर यांचे लहान बंधू डाॕ.नितीन बडगुजर,यांचा बडगुजर विद्याप्रसारक मंडळ तर्फे बडगुजर बोर्डींग येथे नुकताच वार्षिक सर्व साधारण सभेत बडगुजर समाजाच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. प्रा.डाॕ.नितीन बडगुजर यांच्या सामाजिक,शैक्षणीक व विद्यार्थी विकास क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल तसेच राज्यस्तरीय मानवविकास पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.बडगुजर विद्याप्रसारक मंडळाचे श्री.विकास बडगुजर यांचे हस्ते शाल.श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय बडगुजर महासमितीचे अध्यक्ष मा.श्री. माधवराव बडगुजर,माजी अध्यक्ष मा.श्री.उमेश करोडपतीसर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.शंकर पवार, श्री.भिला गिरधर बडगुजर, विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. लिलाधरजी बडगुजर, उपाध्यक्ष श्री.सुरेश बडगुजर, सचिव मा.श्री.राजेंद्र पवार, विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तथा समाज बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डाॕ.श्री.नितीन बडगुजर,यांचे अखिल भारतीय युवक समिती,बडगुजर प्राॕऊड व वेब पोर्टल टीम तर्फे हार्दिक अभिनंदन तथा भविष्यात भरीव कार्यासांठी शुभेच्छाl.


Leave a Reply