नावडेगाव ता पनवेल येथे राहणारे समाज बांधव श्री महेंद्र गोकुळ बडगुजर (मूळ गाव पिंपरखेड ता भडगाव जिल्हा जळगाव) यांची कन्या कु. श्रावणी महेंद्र बडगुजर ही दि. 17 नोव्हेंबर रविवार रोजी झालेल्या “पनवेल तालुका चाचणी कुस्ती स्पर्धेत” 50 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.


श्रावणी सध्या इयत्ता 8 वी मध्ये प. जो. म्हात्रे विद्यालय, नावडेगाव येथे शिकत असून तिने अनेक कुस्ती स्पर्धेत भाग घेतला आहे.
पुढे जिल्हा स्तरावर खेळून भविष्यात भारतीय कुस्ती पटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची तिची इच्छा आहे.
नवी मुंबई बडगुजर समिती आणि badgujar.in वेब पोर्टल यांच्यातर्फे तिचे अभिनंदन.

हार्दिक अभिनंदन श्रावणी ! खुप छान !
व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा !
???