भारतातील पंजाब राज्यात खलिस्तान वाद्यांनी चेव घेतला होता. पंजाब मध्ये शाळेतील लहान मुलांच्या बसमधून मुलांना खाली उतरून खालिस्तान वाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. सर्व कडे आहाकार माजला होता. हिंदुह्रदयस सम्राटमाननीय बाळासाहेब ठाकरे यांनी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारत बंदचे आव्हान करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी बंदमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी मोहनशेठ स्वतः व मुलुंड चे शिशिर शिंदे त्यावेळचे शिवसेना नेते, भा.ज.पा.च्या जयवंतीबेन मेहता यांनी मुलुंड मध्ये रेल रोको केले. ट्रेन समोर जमाव उभा राहिला. ट्रेन काही वेळासाठी थांबली. मी स्वतः लोकल ट्रेनच्या खाली घुसून एम आर कॉक व इतर प्रेशर कॉक बंद केले. त्यामुळे गाडी तेथे ठप्प झाले व मुंबई लोकल बंद झाली. ही खबर साधारण दहा वाजता वाऱ्यासारखे पसरली. रेल्वे रुळावर असंख्य जनसमुदाय उतरला. दुपारी अंदाजे चार वाजता हिंदुरुदय सम्राट माननीयबा ळासाहेब ठाकरे अचानक मुलुंड रेल्वे स्थानकात चार नंबर प्लॅटफॉर्म वर आले. तेथे शिवसैनिकांनी एक माईक लावला होता. बाळासाहेबांनी माईक हातात घेतला व भाषणाला सुरुवात केली. प्लॅटफॉर्म तीन व चार रुळावर व प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी होती. अचानक ठाण्याकडून एक भरधाव मेल मुलुंडच्या दिशेने येऊ लागला. सर्वीकडे हाहाकार उडाला. रेल्वे रुळावर हजारो नागरिक मागे सरकले मेल गाडीचे आठ ते दहा डबे प्लॅटफॉर्मच्या पुढे जाऊन गाडी थांबली.
पलीकडच्या नागरिकांनी सापडतील ते दगड गाडीवर फेकण्यास सुरुवात केली. नागरिक व बाळासाहेब यांच्यामध्ये ट्रेन होती सर्व पळापळ झाले. त्यावेळी मोहनशेठ यांनी स्वतः बाळासाहेबांचा हात पकडून बाळासाहेबांना साईडला सुरक्षित स्थळी नेले. त्यावेळेस सर्वांच्या हृदयात थरकाप उडाला होता. गाडी पुढे जाऊन थांबल्यामुळे आमचा सर्वांचा जीव वाचला कार्यकर्त्यांनी मुळे नावाच्या ड्रायव्हरला पकडून बाळासाहेबांकडे आणले. बाळासाहेबांनी त्याच्या एक कानफटीत वाजविली. मुळे ड्रायव्हरने विनंती करून सांगितले की मी एक मराठी ड्रायव्हर असून ठाणे-मुलुंड रुळावरून मला सिग्नल दिसला नाही. त्यास मुलुंड पूर्वे कडील शाखेत बंद करून पोलिसांच्या हवाली केले. व सर्व मेल ट्रेन मधील प्रवाशांना बाळासाहेबांनी पाणी द्या व त्यांची सुरक्षा करा असे आव्हान केले. हा चितथरारक प्रसंग माझ्या आयुष्यातील फार मोठा होता. या प्रसंगाची आठवण करुन देत असताना बाळासाहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा करताना मी स्वतः श्री. मोहन हिरालाल बडगुजर मातोश्री बंगल्यावर छायाचित्रात दिसत आहे. मला गर्व व अभिमान आहे माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग आहे. आज बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आठवणीच्या निमित्ताने बाळासाहेबांना मी विनम्र आदरांजली वाहत आहे.
जय अखंड हिंदू राष्ट्र !!
श्री. मोहन हिरालाल बडगुजर
अध्यक्ष – अ. भा. ब. स. समाजकल्याण समिती आणि सर्व सदस्य यांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो.


Leave a Reply