व्यक्ती विशेष – आरोग्य सेवक श्री. अनिल राजेंद्र बडगुजर, धरणगांव

व्यक्ती विशेष – आरोग्य सेवक श्री. अनिल राजेंद्र बडगुजर, धरणगांव

अनिल भाऊ हे मूळचे नेहरू नगर, धरणगांव येथील रहिवासी असून, सामाजिक कार्यात त्यांचा अग्रेसर सहभाग असतो. त्यांचे शिक्षण M.com पर्यंत झाले आहे.सध्या ते स्पर्धापरीक्षा संदर्भात अभ्यास करत आहेत.
राजकीय दृष्ट्या त्यांची खूप ओळख आहे. सध्या ते जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे जिल्हा सहसंयोजक म्हणून काम बघत आहेत. तसेच ते अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती सदस्य सुद्धा आहेत. तसेच ते धरणगांव शहर बडगुजर वेब पोर्टल प्रतिनिधी सुद्धा आहेत.
समाज बांधव की इतर समाजाचा व्यक्ती असो कोणालाही कुठल्याही प्रकारच्या आरोग्यविषयक मदत लागल्यास तातडीने धावून जात असतात व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी ते अग्रेसर असतात.

             एखादा समाजबांधव अडचणीच्या परिस्थितीत असेल आणि त्याच्यावर काळाने घात केला असेल अशा परिस्थितीत आरोग्यसेवक अनिलभाऊ बडगुजर हे अशा लोकांना धीर देऊन त्यांच्या परीने शक्य ती मदत मिळवून देण्यास अतोनात प्रयत्न करतात. त्यांनी आतापर्यंत बऱ्याचश्या समाजबांधवांना मदत मिळवून दिली आहे हे नुकतेच टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपल्या समाजातील दोन कॅन्सरग्रस्त पेशंट ॲडमिट आहेत त्यासंदर्भाची माहिती त्यांना www.badgujar.in वेब पोर्टल मार्फत मिळाली आणि त्यांनी तात्काळ मला संपर्क साधून योग्य ते मदत मिळवून देण्याची हमी दिली.  तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना(आरोग्यसेवकांना) हॉस्पिटलमध्ये आवर्जून लक्ष ठेवण्यास सांगितले.
     समजा जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ति आजारी असेल तर त्यांनी अनिलभाऊंशी संपर्क साधावा. संपर्क झाल्यानंतर ते स्वत: किंवा त्यांचे सहकारी आरोग्यसेवक लगेच तुम्हाला संपर्क साधतात व हॉस्पिटल मधे एडमिट(admit) होण्यापासून तर डिस्चार्ज होई पर्यंत शक्य होईल तेवढी मदत ते करत असतात व आतापर्यंत त्यांनी जवळपास 9 ते 10 लोकांना वैदयकीय मदत केली आहे. जर एखादा व्यक्ती किंव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजारी असेल व त्यांची परिस्थिती आर्थिक अडचणीची असेल तर त्यांना आमदार व खासदार निधीतून अर्थिक मदत सुद्धा ते करत असतात. 
       एखाद्या कुटुंबातील सदस्याला कॅन्सर व त्या सारख्या भयंकर आजार झाला व त्या व्यक्तिला जर KEM, टाटा मेमोरियल सारख्या मोठ्या हॉस्पिटल मधे एडमिट(admit) करायचे असेल तर आरोग्यसेवक अनिलभाऊ हे मदत करत असतात.
            त्यामुळे जर आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीय मदत लागेल तर ते  मदत करायला तयार आहेत असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच बडगुजर समाजातील प्रथम डॉक्टर परिषदेचे आयोजन करण्यात त्यांची महत्वपुर्ण भुमिका आहे. आणि भव्यदिव्य आयोजन करण्यासाठी सर्व टिम कार्यशील आहे. आपल्या टिमला प्रेरणादेणे आणि आपली जबाबदारी स्विकारून ती पुर्णत्वास करतात.

सूचना
कोणत्याही व्यक्तिला समजा कॅन्सर(cancer)सारखे मोठे आजार झाले असतील किंवा त्या आजारातील वैद्यकिय ख़र्च 80,000 ते 1,00,000 पेक्षा जास्त असेल अशाच व्यक्तिन्नी संपर्क साधावा…

प्राथमिक संपर्क :

रोहित बडगुजर : 9765627875,
दिनेश बडगुजर : 7709729143,
दिपक बडगुजर : 9860195484,
प्रणव कोठवाल : 9850599053,
विजय बडगुजर : 9921107169.

या सदस्यांना प्राथमिक संपर्क करून योग्यशहानिशहा करूनच मदत करण्यात येईल. अधिक माहितीसाठी युवक समिती अध्यक्ष श्री. दिलीप राघो बडगुजर यांचेशी संपर्क साधावा.

संपर्क
अनिल राजेंद्र बडगुजर
रा.नेहरू नगर, धरणगांव
ता.धरणगांव जि.जळगाव
मो. 9823434713

बातमी संकलन – रोहित बडगुजर, धरणगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*