बडगुजर समाजातील सक्सेसफुल बिजनेस कोच श्री. सुनील जाधव यांनी नुकताच लाईफ अकॅडमी द्वारे आयोजित केलेल्या गेम ओरिएंटेड अॅक्टिव लर्निग अर्थात experiencial learning ची पदवी मिळवली आहे.
पोलीस डिपार्टमेंट मधून सुरुवातीला आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्री सुनील जाधव यांनी बिजनेस कोचिंग मध्ये आपला स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन अनेक विविध कंपन्यांसाठी श्री सुनील जाधव मोटिवेशनल कोचिंग करीत असतात.
एक्सपिरीयन्न्शीयल कोचिंगचा नवा अनुभव नक्कीच त्यांना आपला ब्रँड इंटरनॅशनल लेव्हलला घेऊन जाण्यास समर्थ करेल अशी आपल्या सर्वांकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री. सुनील जाधव सर यशस्वी बिझनेस कोच असून एक कर्तव्यदक्ष समाज बांधव आहेत. आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करीत असतात. तसेच बडगुजर प्राऊड ग्रुप आणि युवक समिती आयोजित चला उद्योजक घडवूया या कार्यक्रमाचे ते एक महत्त्वाचे दुवा आहे. त्यांचा समाज कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभाग असतो. आणि त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून ते वेळ काढून आम्हास मार्गदर्शन करीत असतात. त्यांचे कार्य, मार्गदर्शन, विचार, आचार आणि सकारात्मकता ही नेहमीच प्रेरणा देत असते.
शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply