जळगाव पट्ट्यातील शेतकरी हतबल – सोयाबीन, ज्वारीच्या उभ्या पिकाला आले कोंब

ज्वारीचे पिक भिजले, लोंबीला आले कोंब

जळगाव : यावर्षी पावसाने खान्देश मध्ये प्रचंड थैमान घातले. सरासरीच्या एक ते दीड हजार मिलिमीटर पाऊस जास्त झाल्याचे आकडे आहेत. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पिकांचे प्रमाणात नुकसान झाले.या स्थितीचा हा आढावा- 

खान्देशात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रात ज्वारी, सोयाबीन, तसेच इतर पीक काढले जाते. त्यापैकी अनेक तालुका क्षेत्रातील तयार पीक सडले असून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. त्याच बरोबर सोयाबीन या पिकांनाही फटका बसला असून शेतात धान्य शिल्लक राहिले नसल्याने हलाखीची स्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्येही अशीच स्थिती आहे.

श्री. रवींद्र पवार-बडगुजर (पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) यांच्या 2.5 एकर शेतातील ज्वारीचे पीक पक्के झाल्या नंतर कापणी केली, परंतु अतीवृष्टी मुळे ज्वारीचे कणसातील दाण्यांना मोड (कोंब) आले व  त्यामुळे 100% पिकांचे सुमारे 80000/- रू चे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर 3 एकर सोयाबीन पीकांचे ही दाणे शेतातच मोड येवून 50000/-चे नुकसान झाले. अश्याप्रकारे खान्देशातील गरीब शेतकरी लाखोंचे नुकसान कसे सहन करू शकेल ?  आहो, शेतकरयांनी वर्षभर खायचे काय?

या पार्श्वभूमीवर खान्देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करावी अशी मागणी सुरू झाली आहे. मात्र ५०% पेक्षा अधिक नुकसानीचा आकडा जाणार नसल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातील निकषामध्ये शिथिलता आणून निव्वळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी तशी पावले उचलली जावी अशी आर्त हाक येथील  शेतकऱ्यांनी मारली आहे. 

सध्या महाराष्ट्रात सत्ता युद्धात जुंपलेले राजकारणी या शेतकऱ्याच्या आर्त हाकेकडे लक्ष देतील काय? एका हतबल शेतकऱ्याची हि हाक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत कराल काय?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*