इ.स. 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी 1 नोव्हेंबर 1956 रोजी सूत्रे हाती घेतली होती.

तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (1 मे, 1960) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासाची मुळे ही यशवंतरावांच्या कार्यात असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
ते प्रागतिक विचारसरणीचे होते. ते उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते.
यशवंतरावांनी राज्यासाठी असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय पुढीलप्रमाणे :
1. पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात.
2. राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ.
3. कोल्हापूर बंधार्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती.
4. 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना.
5. मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना.
6. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग.
7. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना.

Leave a Reply