समाज कल्याण समिती अध्यक्षांचे समाज कल्याणकारी कार्य शैक्षणिक संस्थेला मिळवून दिली मंजुरी
मु. पो. कोढेरी ता. कल्याण जिल्हा ठाणे येथे अजून पर्यंत कुठलीही मोठी शाळा नाही. सांगोळा, कोढेरी, वासुंद्री या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दोन ते तीन किलोमीटर पर्यंत लांब खडतर प्रवास करत जावे लागत असे. तसेच पावसाळ्यात नद्यांना येणारा पूर, जोरदार पाऊस तसेच उन्हाळ्यात प्रचंड हाल होत असत.
विद्यार्थ्यांना होणारे हाल अपेष्टांची दखल घेऊन या विभागात नवीन शाळेची विनंतीपूर्वक मागणी केली असता भारतीय जनता पार्टीचे डोंबिवली कल्याण जिल्हा ठाणे चे सरचिटणीस तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समितीचे अध्यक्ष मा. श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार साहेबांना मार्फत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री नामदार श्री. आशिष शेलार साहेब यांच्याकडून नवीन शाळेचे मागणी मंजुरी मिळवून दिली.
शाळेसाठी मंजुरी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे यशोललक्ष एज्युकेशन सोसायटी कडून जाहीर आभार मानण्यात आले. या संस्थेला प्राथमिक व माध्यमिक शाळेची परवानगी मिळवण्यासाठी अ. भा. ब. समाज कल्याण समितीचे प्रमुख श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी जे अनमोल सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे उत्कर्ष मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री. अवधूत चव्हाण यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व आभार पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच आम्ही अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने
मोहनशेठ बडगुजर यांचे जाहीर अभिनंदन करून आभार मानत आहोत. असेच चांगले कार्य नेहमी नेहमी आपल्या हातून घडावे व आम्हाला सर्वांना आपल्या कडून प्रेरणा मिळावी ही शुभेच्छा.
श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर
उपाध्यक्ष –
अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती.
श्री. घनश्याम रामदास अलोने
श्री. आशिष पितांबर बडगुजर
श्री. किशोर सहादु बडगुजर
डॉ. अतुल बडगुजर श्री. श्रीकृष्ण धोंडू बडगुजर
सौ. रेवती बडगुजर सौ. शैला किशोर बडगुजर, श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, श्री. लोकेश कोतवाल, सर्व सन्माननीय सदस्य


Leave a Reply