एस.के.पाटील विद्यामंदीर माकुणसार शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरदकुमार शिंदे (बडगुजर) सर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या शाळेतील इयत्ता ६ वी च्या चार विद्यार्थिनींना बॅंक ऑफ इंडिया – शाखा सफाळे कडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. शुक्रवार दि. २७/०९/२०१९ रोजी बॅंक ऑफ इंडिया शाखा सफाळे चे शाखा व्यवस्थापक श्री.संजय रजक सर, बॅंकेच्या कर्मचारी शेख मॅडम व प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन १) कु.रिद्धी दिलीप बरफ, २)कु.दिशा अरूण भावर, ३)कु.जान्हवी वंदेश दोधडे, ४)कु.रचना राजेश भोईर (सर्व इयत्ता सहावी) या चार विद्यार्थिनींना प्रत्येकी १२०० रूपये चे धनादेश शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करण्यात आले. ती रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाईल असे सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक व इतर कर्मचारीही उपस्थित होते. ही शिष्यवृत्ती अशीच पुढे इयत्ता दहावी पर्यंत सदर विद्यार्थिनींना देण्यात येईल असे बॅंकेच्या प्रतिनिधीनी सांगितले. मा.मुख्याध्यापक यांनी बॅंक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक व इतर कर्मचारी वर्गाचे संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने व मुख्याध्यापकांच्या वतीने आभार मानले. व यापुढे ही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली….????
बातमी संकलन : श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर, नाशिक


Leave a Reply