रविवारी सोनशेलू येथील चामुंडा माता मंदिरावर महाआरती व भव्य रक्तदान शिबिर – श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

शिंदखेडा-तालुक्यातील सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता मंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्त दि.६ ऑक्टोबर रविवार रोजी अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती व महाप्रसाद तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा बडगुजर समाज बांधव तसेच मॉं चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज बांधव सोनशेलू यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता मंदिरावर दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त दि.६ ऑक्टोबर रविवार रोजी अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथील चामुंडा मातेचे मंदिर जागृत देवस्थान असून येथे राज्यासह परराज्यातून समाज बांधवांबरोबरच पंचक्रोषितील नागरीक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. सालाबादाप्रमाणे यंदाही दि.६ ऑक्टोबर २०१९ रविवार रोजी चामुंडा मातेच्या मंदिरावर सकाळी ९ वाजता होमहवन, १०.३० वाजता महाआरती व ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चामुंडा माता ट्रस्ट सोनशेलू व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बडगुजर प्राऊड गृप, सरस्वती मिशन संस्था व नवोदय युवा मंच यांच्या सहकार्याने त्याच दिवशी सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा बडगुजर समाज बांधव तसेच मॉं चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज बांधव सोनशेलू यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*