बडगुजरांच्या फोफावलेल्या संघटना आणि सत्कार समारंभाचे फुटलेले पेव – डॉ. उमेश बडगुजर

सात आठ वर्षांपूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर बडगुजरांच्या विविध ग्रुपचं एक प्रकारे वादळ आलं होतं. जो तो उठला आणि ग्रुप काढला अशी त्यावेळची परिस्थिती होती .अशा परिस्थितीत सर्वांनाच समाजसेवेची ओढ लागली .काहींनी संघटना काढल्यात काहींनी मिशन काढले काहींनी संस्था काढल्या काहींनी त्या धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टरही केल्या .काही ठराविक चांगले कार्यक्रम केल्यानंतर समाजात फुटलं फक्त आणि फक्त बक्षीस समारंभ सत्कारांच पेव.जो तो उठला की बक्षीस समारंभ ठेवायला लागला . बक्षीस समारंभाची तयारी जेवण नुसता बडेजाव आणि इतरांपेक्षा आपला कार्यक्रम किती रिच होता ही दाखवण्याची धडपड .एक प्रकारची जीवघेणी स्पर्धा या चारपाच संघटनांमध्ये चालू झाली .त्यात त्रिज्यास्तरिय, राज्यस्तरीय बक्षीस समारंभ असे प्रकार घडायला लागले. या बक्षिस समारामध्ये विद्यार्थ्यांचं कौतुक कमी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त दिसून यायचा .फोटो बाजी होर्डिंगबाजी नंतर सोशल नेटवर्किंग साइटवर शेख्या मारणे हे प्रकार यातून वाढायला लागले .
मुले हार तुरे नंतर राजकीय नेते ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे स्वताचे कोडकौतुक करून घेणे यामुळे हा प्रकार किळसवाणा वाटायला लागला .
आता तर बक्षीस समारंभ म्हटला की अंगावर सर्रकन काटा येतो .
या मंडळींना पैसे देणारे लोक हे अक्षरशा मूर्ख ठरत आहेत .त्यांचा सर्व पैसा यांना प्रोजेक्ट करण्यासाठी वापरला जात। समाजाचा फायदा या पैशाने होईल असे काही दिसत नाही .तेव्हा यांना पैसे देणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा विचार आता करायला हवा. काही संस्था रजिस्टर्ड आहेत तर काही अन रजिस्टर .रजिस्टर संस्था धर्मादायांकडे त्यांचा हिशोब नेहमी सादर करत असतील पण छोटय़ा छोटय़ा गोष्टी किंवा छोटे छोटे सत्कार सोशल मीडियावर टाकणाऱ्या या संस्था किंवा संघटना या कधी हिशेब सोशल मीडीयांवर टाकताना दिसल्या नाहीत .कदाचित ज्या लोकांकडून हे लोक पैसे घेत आहेत त्यांना त्या संस्था हिशेब देत असाव्या. बाकी विना रजिस्टर संस्थांची गोष्टच वेगळी आहेत त्यांचा काय कारभार चाललाय हे फक्त त्यांना आणि त्यांनाच माहित .त्रिराज्यस्तरीय बक्षीस समारंभ हा प्रकार म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे .बाहेरच्या विद्यार्थ्यांनी बक्षीस घेण्यासाठी बाहेरच्या राज्यातून पैसे खर्च करून येऊन हजार रुपये बक्षीस घेण्यासाठी दोन हजार रुपये भाडे खर्च करणे म्हणजे मूर्खपणा आहे .वर आलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची सोय करणे हे आद्यकर्तव्य आहे किंवा ती करावे लागणार हे आपल्यालाही कळते.म्हणजे हजार रुपये बक्षीस देण्यासाठी आपण जवळपास एका विद्यार्थ्यांमागे अडीच तीन हजार रुपये खर्च करत आहोत हे या लोकांना कळत नाही .बक्षीस द्यायचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध असताना फक्त मोठेपणा करणे बडेजाव करणे यासाठी हे असले कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तुम्ही बक्षीस हे मनीऑर्डर करून किंवा खात्यावर टाकून किंवा वेगवेगळ्या शालेय उपयोगी वस्तू कुरियर करूनही देऊ शकतात त्यात येणाऱ्याचा पैसा ,हॉलचा खर्च, जेवनाचा खर्च इत्यादी गोष्टी वाचू शकतात हे कळण्याइतपत मूर्ख हे आयोजक लोक नक्कीच नाही .पण तसं केलं तर यांचे पेपरात फोटो कसे येणार णि यांना पेपरमध्ये फोटो आल्याशिवाय करमत नाही मग समाजाचा कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल.हि लोके नक्की सुधारणार नाही .तर आपण आता सुधारायला हवं .आपण अशा लोकांना देणगी स्वरूपात किंवा मदत स्वरुपात पैसे द्यायला नको .आपल्या घरातही सत्काराचे विद्यार्थी असतील तरी या विद्यार्थ्यांनी अशा सत्कारांना जाणे टाळाव. जवळ असल्यास जायला हरकत नाही .

दर पंधरा वीस दिवसाआड बक्षीस समारंभ घडविन्याने समाज प्रगती करत नाही हे या लोकांना कधी कळनार देव जाने .आई चांमुडा यांना सद्बुद्धी देवो.

डॉ. उमेश बडगुजर .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*