प्रा. शंतनू नंदलाल पवार सर यांना उ. म. वि कडून Environment या विषयात पी. एच्. डी प्रदान

आपणास कळविण्यास आनंद होत आहे की बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळचे सदस्य श्री. नंदलाल पवार यांचे मोठे चिरंजीव प्रा. श्री. शंतनू नंदलाल पवार यांना आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून Environment या विषयात पी. एच. डी बहाल करण्यात आली.

प्रा. शंतनू बडगुजर हे मुळचे पिंप्री खुर्द येथील रहिवासी असून सध्या ते जळगावला वास्तव्यास आहेत. त्यांनी BE Civil, त्यानंतर M.E. (Environment Engineering) पर्यंत चे शिक्षण पुर्ण केले. सध्या ते जी. एच. रायसोनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. कॉलेजमध्ये नोकरी करत असतांना त्यांनी Ph.D – In Civil engineering – Subject-
Photo induced catalytic treatment of pulp and paper industry wastewater. याविषयात पी. एच्. डी प्राप्त केली.

त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोसायटीचे चेअरमन आणि कॉलेजचे प्रिन्सिपल यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थी वर्गात सरांनी बनवलेल्या पीएनजी बद्दल उल्हासाचे वातावरण आहे. तसेच बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.

तसेच त्यांनी बडगुजर प्राऊड ग्रुपचे लोकेश कोतवाल यांना एमबीएचे शिक्षण घेत असतांना तसेच इतर बऱ्याच विद्यार्थ्यांना रायसोनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना शैक्षणिक मार्गदर्शन केलेले आहे. आणि नेहमी करीत असतात.

तरी सरांना मिळालेल्या पी. एच्. डी. बद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्हाला सर्वांना आपला अभिमान आहे. आणि आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहावी. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*