सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी चोपडा तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व साधारण सभेत श्री.विजय हिरालाल करोडपतीसर (बडगुजर)यांची सलग तिसऱ्यांदा(हॕट्रीक)अध्यक्षपदी बिनविरोध अभिनंदनीय निवड झाली. श्री.करोडपती सर हे चोपडा शहरात सामाजिक कार्यात सातत्याने रूची घेतात,तसेंच ते चोपडा येथील पुज्य साने गुरूजी विद्या प्रबोधीनी मंडळाचे संस्थापक सचीव म्हणून सन १९९०पासून कार्यारत आहेत.अ.भा.बडगुजर समाज महासमीतीचे माजी अध्यक्ष श्री.ऊमेशआप्पा करोडपतीसराचे ते थोरले बंधू असून- बडगुजर समाज मंडळ,चोपडा अध्यक्ष,जळगांव जिल्हा शिक्षक संघटणा उपाध्यक्ष तसेंच जळगांव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची पत संस्थेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते श्री.पंकज करोडपती यांचे पिताश्री आहेत. श्री.व्ही.एच्.करोडपतीसर यांनी अध्यक्षपदाची हॕट्रीक साधले बद्दल त्यांचेवर चोपडा शहरांत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अध्यक्षपदी निवड झाले बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply