कुर्हे पानाचे येथील चि. दिपक पंडित बडगुजर यांचे एमपीएससीमार्फत सहाय्यक नगर रचना अधिकारी (राजपत्रित) म्हणून निवड : – श्री. किरण बडगुजर सर, कुर्हे पानाचे
कुठे पानाचे येथील रहिवासी श्री पंडित सुकलाल बडगुजर यांचे चिरंजीव दीपक पंडित बडगुजर यांचे नुकतेच एमपीएससी मार्फत सहायक नगर रचना अधिकारी म्हणून निवड झाली.
चिरंजीव दीपक यांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे बी. टेक पर्यंतचे शिक्षण पुण्यातील COEP कॉलेजमध्ये पूर्ण केले.
इंजिनिअरिंगच्या शिक्षणासोबतच स्पर्धापरीक्षांची तयारी सुद्धा करीत होते. तसेच जळगाव येथे युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित एमपीएससी/यूपीएससी मार्गदर्शन प्रा. कोटवे सर या कार्यक्रमास सुद्धा ते उपस्थित होते.
आधीपासूनच शिक्षणाची आवड त्याला होती. तसेच त्याचे मोठे बंधू परेश बडगुजर हे नेहमी त्याला मार्गदर्शन करीत असत. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आणि समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण कुर्हे गावातून पहिला बडगुजर समाज बांधव एमपीएससीमार्फत अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
चि. दिपकचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा… शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply