जळगांव येथे शहीद भगतसिंग विचारदर्शन वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमात चि. चेतन बडगुजर यास द्वितीय क्रमांक – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव

28 सप्टेंबर 2019 रोजी भगतसिंग जयंती निमित्त भारती फाउंडेशन यांच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 13 कॉलेजेस व 5 शाळांनी सहभाग नोंदविला होता. सदरचा कार्यक्रम रोटरी भवन जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला होता.

भरारी बहुउद्देशीय फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष श्री दिपक परदेशी हे या कार्यक्रमाचे प्रमुख होते. जळगाव येथील रिक्षाचालक श्री. सुनिल गंगाराम बडगुजर यांचे चिरंजीव चेतन सुनिल बडगुजर याने ऐ. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातून इयत्ता नववीच्या वर्गातून सदर कार्यक्रमात भाग घेतला होता. त्याने भगतसिंगांचे ‘सामाजकल्याण विषयक कार्य’ यावर विचार व्यक्त केले. के. के. फॅन्स व नवजीवन सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रथम क्रमांक इकरा उर्दू शाळेने तर द्वितीय क्रमांक ए. टी. झांबरे विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांच्या चमूने द्वितीय क्रमांक पटकाविला. शाळेसाठी ट्रॉफी व प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

चि. चेतन सुनिल बडगुजर

सदर यशासाठी चि. चेतन बडगुजर याचे बडगुजर समाज वतीने अभिनंदन केले जात आहे. चि. चेतन बडगुजर याला या अगोदर शिवाजी महाराजांच्या पोवाडा गाण्यासाठी सुद्धा बहिणाबाई महोत्सव तसेच इतर कार्यक्रमां मध्ये नेहमी आमंत्रित केले जाते. उत्कृष्ट वकृत्व शैली यामुळे वकृत्व मध्येच करिअर करण्याचा निर्णय चेतनने घेतला आहे. त्याला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छूक :

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

शब्दांकन : प्रा. मिलिंद बडगुजर सर, जळगांव संपर्क : 9421184495

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*