बडगुजर समाज बहिणी आणि बंधूंनो ,
नमस्कार !
समाजाची ख्याती वाढावी ही आपल्या सर्वांची भूमिका आहे.
समाज म्हणजे समाजातील माणसे. सर्व सामान्यांना प्रगतीची प्रेरणा मिळायला हवी. त्यांचा उत्साह वाढायला हवा.आनंदाने प्रगती करण्यासाठी उत्साह वाढायला हवा. तसे सामाजिक वातावरण आपण सर्वांनी मिळून तयार करावयाचे आहे. या साठी पुष्कळ बडगुजर मान्यवर व बडगुजर सामाजिक संघटना कार्यरत आहेत. त्यांना शक्य ते सहकार्य आपल्या परीनं प्रत्येकास करावयाचे आहे. समाज आपल्यासाठी काय करतो ? हा प्रश्न आपण विचारतो ; पण समाजासाठी आपण काय करतो ? हा प्रश्नही प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. म्हणजे आपण सामाजिक कार्यात नक्कीच हातभार लावायला प्रव्रूत्त होऊ. समाज कल्याण कार्याची समाजास आवश्यकता आहे. एकमेकांना सामाजिक कार्यात सहयोग करणे , आपले मतभेद विसरून अशा विधायक कामात झोकून देणे ; हे आव्हान युवक नक्कीच स्विकारतील.कारण ‘व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे’ , हे तत्त्व स्विकारले की विधायक व्रूत्तीचा भाव मनात प्रकटतो. ‘आपल्या वरील वैयक्तिक टीका सुध्दा विसरणे’ हे धोरण सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक काम करताना समाज हितासाठी मोठेपणाने अंगीकृत करणे ; आवश्यक आहे. आमचे तेजस्वी युवा अशा विधायक विचाराचे आहेत ; म्हणून समाजात चांगली कामे ठिकठिकाणी होत आहेत.त्यांच्या कार्याचे समाजाकडून जोरदार स्वागत होणे गरजेचे आहे. शाबासकीची थाप युवकांच्या पाठीवर द्यायलाच हवी. सोशल मिडियाच्या माध्यमातून अशी क्रुती होणे ;ही आज कठिण बाब राहीलेली नाही. जाणीव असणार्यांना यासाठी दिवसातून थोडा वेळ काढायला हवा.
समाजातील प्रतिभावंतांना प्रतिसाद देणे , सहयोग करणे ,समाजाचे माननीय पदाधिकारी , विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या पाठीशी समाजाने, दानशूरांनी उभे राहिले पाहिजे. कोणी घाम द्यावा, कोणी वेळ द्यावा, कोणी विचार द्यावे तर कोणी धन ! प्रोत्साहन देत राहाणे हे जेष्ठांचे काम आहेच.
समाजातील विविध क्षेत्रातील गुणवान व्यक्तींना प्रेरणा देण्याचे, त्यांची ख्याती वाढविण्याचे , सहकार्य करणे ही कामे होत आहेत. प्रत्येक सामान्य जनांस पुढे नेणे हे सत्कार्य माननीय नेते करीत आहेत व करीत राहतील हा विश्वास आहे. कारण ‘बडगुजर युवक’ समाजास पुढे नेतील ही बाब आम्हाला आश्वस्त करणारी आहे.
सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.
आपण ‘मन,मनी,मगगट,
मशिनरी व मार्केटिंग’ या सर्व बाबतीत मजबूत होणे गरजेचे आहे.
यासाठी चांगल्या कंपन्यांमध्ये, शासकीय-प्रशासकीय नोकर्यांमध्ये,उद्योग व्यापार क्षेत्रात, धंद्यात,औद्योगिक कारखानदारीत व राजकीय क्षेत्रात आपण शिरकाव करायला हवा. आपला दबावगट निर्माण होत आहे.
यासाठी साथ देणारे युवा आहेत .धडपडणारे तरुण आहेत समाजात ; ही आनंदाची बाब आहे.
या समस्त युवकांचे अभिनंदन !
विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास मनलावून करावा. विज्ञान निष्ठा ,विवेक बुद्धी व स्वतःवर विश्वास ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत रहावी. कठोर परिश्रमास पर्याय नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा आपण मागे पडू ही भिती आहेच. संख्येने आपण कमी आहोत पण अफाट ताकदीने आपण आपले अस्तित्व सिद्ध करून राज्य करू हा विश्वास ज्ञान संपादन करून येईल.
मात्रुशक्तिस वंदनही करतो की त्या सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत, कर्तुत्ववान अशा युवक युवतींना त्या
घडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
शिवाय मात्रुशक्तिवर जबाबदारी आहे ती कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी मुलांमुलींवर सुयोग्य संस्कार करण्याची. आपले मुलंमुली काय करीत आहेत , हे बघण्याची ,
त्यांना वळण लावण्याची , सामाजिकता जोपासण्याची शिकवण आई देते. कौटुंबिक नातं कसं समजूतदारीने निभवायचं असतं ,सहनशीलता, संयम, साहस, सदाचार, सात्विकता व समजुतदारपणा व समाजावर प्रेम करणे याची शिकवण अपत्यांना देणे हे मोलाचे कार्य आई करीत असते.
समाजातील मुलांचे विवाह होणे, झालेले टिकवून ठेवणे ही प्रत्येक सुकन्येची , मुलाची व प्रत्येक आई बापाची भुमिका असली पाहिजे.
तेव्हाच सुकन्येस वहिनी मिळेल.
निर्व्यसनी, होतकरू उद्योगी मुलांना मुली मिळायला हव्यात याचा विचार सुकन्येच्या आईवडिलांनीच करायचा आहे.
सांसारिक प्रगती हळूहळू होईलच हा सकारात्मक विचार ठेवावा.
सुनांनाही मुलीप्रमाणेच कोडकौतुकाने , प्रेमाने सासरच्या मंडळींनी सन्मानाने वागवावे.
समाजातील गुणवंत, होतकरू व गरजू मुलींना सक्षम करण्यासाठी समाज प्रयत्नशील आहे; ही सुद्धा स्वागतार्ह बाब आहे.
माझा लेख मी मान्यवर समाज नेतृत्व,विविध सामाजिक संघटना- पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज मार्गदर्शक, उद्योगपती, विचारवंत व दानशूरांना समर्पित करतो.

?
लेखक – डॉ. दिलीप धोंडू बडगुजर
अमरावती

Very nice thoughts… Much needed to be implemented. We can start it from our own. Thanks for informative post.
आभार मान.श्री लोकेश कोतवाल सर.
बडगुजर नवतरुणांवर आमचा विश्वास आहे.
मन-मनी-मनगट-मशीनरी-मार्केटिंग यां बाबींवर समाजाची पकड असण्यासाठी सुयोग्य managementठेवून समाजाची प्रगती युवा मिळून करतील;हा भरवसा आहे/dr.ddb