सेंट जोसेफ स्कूल चाळीसगांव चा ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थी चि. कुशाग्र प्रशांत बडगुजर हा रोलर स्केटिंग स्पर्धेत प्रथम

रोलर स्केटिंग स्पर्धेत चाळीसगांवच्या खेळाडूंचा विजय
रोलर स्केटिंग स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूलचा विजय, स्पर्धेत ४० शाळांचा सहभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उर्वरित जिल्हा स्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल चाळीसगांव येथे आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत चाळीसगांवच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले.
या स्पर्धेत ४० शाळांचे १८० खेळाडू मुलां – मुलींनी सहभाग नोंदवला.
उद्घाटन सिस्टर लिली जोसेफ,अध्यक्ष प्रिन्सिपाल सिस्टर लिजी, उद्योजक पारस जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल शिरसाठ योगेश शिंदे उपस्थित होते. पंच म्हणून श्याम शिंगणे, गिरीश पाटील, प्रणव चौधरी, युवराज माळी, सय्यद सैफ अली, तुषार सैतवाल यांनी काम पाहिले.

चि. कुशाग्र प्रशांत बडगुजर

निकाल पुढील प्रमाणे-
११ वर्षा आतील काइड् मुले-
१) कुशाग्र बडगुजर, २) कार्तिक जाधव
सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल चाळीसगांव,
नील सोनवणे, शिंदे इंटरनॅशनल
मुली – आर्या साळुंखे,उदिता दायम पोंदर,
मान्यता वाधवा, इनलाईन – मुले – वीर भोसले,मेहूल चौधरी, मोहित शेटे, मुली – कोमल महाजन, प्रिया ओस्तवाल
इत्यादी मुला-मुलींनी सहभाग घेऊन यश संपादन केले.
टिप : रोलर स्केटिंग स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूलचा ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थी डॉ.सौ.चंचल प्रशांत बडगुजर व डॉ.प्रशांत संतोष बडगुजर यांचा जेष्ठ सुपुत्र-चि.कुशाग्र ह्याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून चि.कुशाग्र हा अ.भा.बडगुजर समाज ओबीसी समिती उप प्रमुख एस्.एम्.बडगुजर यांचे मोठे बंधु श्री.संतोष मोतीराम बडगुजर व मा.प्राचार्य.बी.जी बडगुजर सर यांचा नातू असून चि. कुशाग्र ने रोलर स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याचे सर्व स्तरावर नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळी,काका काकू आजी, आजोबांच्या कडून भरभरून कौतुक केले जात आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदन!

अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*