महत्वाची सूचना : ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी

शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग,
शासन निर्णय, क्रमांक :शिवृत्ती २०१८/प्र.क्र.२८३/शिक्षण,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक :३० जानेवारी, २०१९
वाचा :१.समाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व क्रिडा विभाग शासन निर्णय क्रमांक.इबीसी-१०९४

/३२०३८/ प्र.क्र.९०/मावक-२दिनांक १२ जानेवारी, १९९६
२.संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्र.विजाभजसं
/शिक्षण/इमाव साफुशिप्रस्ताव १३/२०१६-१७/ १९२६/पुणे, दि.१६/२०१६ व
दि.०३/०१/२०१९

प्रस्तावना:-

राज्यातील मागासवर्गीय मुलींचे (अनुसुचीत जाती/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती, धनगर, वंजारी
सह व विशेष मागासप्रवर्ग) प्राथमिक शाळामधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टीकोणातुन इयत्ता ५ वी ते
इयत्ता७वीच्या मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय दि.१२ जानेवारी १९९६ अन्वये
सुरु करण्यात आली आहे.

त्याच धर्तीवर राज्यातील इतर मागास प्रवर्गातील मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे
शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, त्यांचा शैक्षणिक सर्वागिण विकास व्हावा म्हणून राज्यातील इयत्ताप
वी ते ७ वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास
मा.मंत्रिमंडळाने दिनांक १५.०१.२०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे।
मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
शासन निर्णय :-

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते ७ वा मध्ये शिकणा-या मुलीसाठी सन २०१९-२० ।
या शैक्षणिक वर्षापासन “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागु करण्यास शासन मान्यता देण्यात येत

आहे.

अटी व शर्ती:-
१. सदरची योजना राज्यातील प्राथमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या इतर

मागास प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील मुलींना लागु राहील
२. सदर योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाची अट लागु राहणार नाही.
३. इयत्ता ५ वी ते ७ वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलीसाठी. दरमहा रु.६०/- प्रमाणे १०

महिन्यांसाठी रु.६००/- इतका लाभ देय राहील.
मा.मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे सदर योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष प्राप्त करुन घेण्याची
कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात यावी.

सदर योजनेवरील अनुदान व खर्चाबाबत संचालक,विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय पूर्ण है।
नियंत्रक अधिकारी राहतील. सदर अनुदानाची रक्कम आहरित करण्यासाठी कक्ष अधिकारी/ अवर सचिव
(अर्थसंकल्प), विजाभज इमाव व विमाप्र कल्याण विभाग, आहरण व संवितरण अधिकारी, विमुक्त जाती भटक्या
जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना घोषित करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. एस्. एम. बडगुजर, डोबिंवली : 9967906263.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*