फागणे येथील श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांची कृषी महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड

बडगुजरांचे पाऊल पडती पुढे… काल पुन्हा एकदा समाजासाठी आनंदाची बातमी आली की श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांची कृषी महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. आपले बडगुजर समाज बांधव प्रत्येक क्षेत्रात आज भरारी घेत आहेत. श्री. निंबा बडगुजर यांचा सत्कार, फागणे येथील सामाजिक कार्यकर्ते बडगुजर युवक संघटनेचे माजी सचिव धुळे तालुका बडगुजर समाज चे सचिव श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांची कृषी महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचा आज दिनांक 22/9/2019 रोजी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांन तर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला असुन भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री. नारायण बडगुजर, श्री. संजय बडगुजर, श्री. दिनकर चव्हाण, श्री. बबलू बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. निंबा बडगुजर यांची चेअरमनपदी निवड झाल्या बद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप

2 Comments

  1. श्री निंबा बा. बडगुजर साहेब फागणे यांचे अभिनंदन! छान बातमीपत्र ! समाज प्रगतीच्या वाटेवर आहे. आनंद वाटला./ डॉ दिलीप -सौ. स्वाती बडगुजर।अमरावती

  2. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ?
    समाजासाठी गौरवास्पद बाब ! ?
    पुढील वाटचालीस शुभेच्छा !?

Leave a Reply

Your email address will not be published.


*