बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे आयोजित गुणवंत पाल्यांचा गुणगौरव व सामाजिक कार्यकर्ते बंधू- भगिनींचा सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न

बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद यांनी आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव व सामाजिक युवा कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा रविवार 22 रोजी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमासाठी बडगुजर समाजातील विविध शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते सर्व बडगुजर समाज बांधवांनी एकत्रित यावे या संकल्पनेतून औरंगाबाद समाज मंडळ यांनी सर्व प्रमुख अतिथींचा एकच फुलहार ने सत्कार केला. औरंगाबाद बडगुजर समाजाची ह्या संकल्पने चे सर्व प्रमुख अतिथी यांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विविध शहरातील बडगुजर मंडळातील कार्यकर्त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.

बडगुजरसमाज मंडळ औरंगाबाद तर्फे गुणवंत पाल्यांचा सत्कार व सामाजिक कार्यकर्ते बंधू-भगिनींचा सत्कार लाइव्ह प्रक्षेपण

आजचा झालेला औरंगाबाद समाज मंडळाचा झालेला अभुतपुर्व कार्यक्रमाचे लाईव्ह व्हिडीओ खास आपल्या सर्वांसाठी खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध करण्यात आले आहे.

भाग – १

https://youtu.be/E346RHNFlxo

भाग – २

https://youtu.be/cMETCJw9fWc

भाग – ३

https://youtu.be/-B-9rahlZSE

भाग – ४

https://youtu.be/qHaeSaJnoew

भाग – ५

https://youtu.be/KoKsSHqBZFY

व्हिडीओ सौजन्य :

औरंगाबाद बडगुजर समाज मंडळ
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड
वेब पोर्टल टिम

कार्यक्रमातील अभुतपुर्व क्षण – मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

3 Comments

  1. सर्व समाज बांधवांना एकाच माळेत गुंफण्याचा औरंगाबाद बडगुजर समाज मित्र मंडळाची युक्ती खूपच प्रशंसनीय आहे.

    सोशल मीडिया बद्दल समाज बांधवांना जागृत करणे त्यासाठी आयोजित केलेली वकृत्व स्पर्धा आयोजित केली ही संकल्पना सुद्धा खूप छान होती.

    संपूर्ण औरंगाबाद बडगुजर समाज मंडळाचे हार्दिक अभिनंदन.

  2. औरंगाबाद समाज बांधवांनी साकारला भव्य सोहळा. समाजातील माननीय पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्त्यांची मौलिक उपस्थिती व समाजोपयोगी मार्गदर्शन ! अभिनंदन आणि शुभेच्छा!/ ‘डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर’:अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*